गव्हाऐवजी ज्वारीची भाकरी खाण्यास करा सुरुवात, तुमच्या आरोग्यात होतील ‘हे’ आरोग्यदायी बदल

आपण प्रत्येकजण आपल्या निरोगी आहारात गव्हाच्या पोळीचा समावेश असतो. पण जर तुम्ही गव्हाच्या पोळी ऐवजी ज्वारीची भाकरी खाल्ली तर तुमच्या आरोग्यासाठी किती फायदे मिळू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? खरं तर, ज्वारीच्या रोटीमध्ये असे अनेक पोषक घटक असतात जे गव्हाच्या पोळी मध्ये आढळत नाहीत. चला जाणून घेऊया ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे कोणते आहेत?

गव्हाऐवजी ज्वारीची भाकरी खाण्यास करा सुरुवात, तुमच्या आरोग्यात होतील हे आरोग्यदायी बदल
Wheat Flour
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jul 17, 2025 | 6:58 PM

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे लोकं त्यांच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत. त्यामुळे आहारात आरोग्यदायी बदल करण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. अशातच तुमच्या आहारात गव्हाच्या पोळी ऐवजी ज्वारीची भाकरी खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

ज्वारीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि ती अनेक आजारांपासून बचाव करण्यास देखील मदत करते. ज्वारीच्या पिठाची भाकरी खाल्ल्याने कोणते आरोग्य फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊया.

ज्वारीची भाकरी का फायदेशीर आहे?

ज्वारी हे ग्लूटेन-मुक्त धान्य आहे, ज्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. तर या भाकरीचे सेवन केल्याने मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोग टाळण्यास मदत करते. ज्वारीचे पीठ गव्हाच्या तुलनेत पचायला सोपे असते आणि ते रक्तातील साखर नियंत्रित करते.

ज्वारीच्या पिठाची भाकरी खाण्याचे फायदे

मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त – ज्वारीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील साखर अचानक वाढू देत नाही. त्यात असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यास उपयुक्त – ज्वारीच्या भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे भाकरीचे सेवन केल्यास पोट बराच काळ भरलेले राहते आणि अनहेल्दी स्नॅक्स खाण्याची इच्छा कमी होते. तसेच तुमची चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.

पचनसंस्था मजबूत करते – ज्वारीमध्ये डाएटरी फायबर असते, जे बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता यासारख्या समस्यांपासून आराम देते. तसेच आतडे निरोगी राहल्याने तुमची पचनक्रिया देखील सुधारते.

हाडे मजबूत करते – ज्वारीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते. यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

ऊर्जा वाढवते- ज्वारीमध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असते, जे शरीरातील अशक्तपणा दूर करते आणि शरीरात उर्जेची पातळी वाढवते.

हृदयासाठी फायदेशीर – ज्वारीमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयरोगाचा धोका कमी करतात. त्याचबरोबर रक्तदाब देखील नियंत्रित करते .

ग्लूटेन-मुक्त – ज्यांना गव्हाची ॲलर्जी आहे किंवा ज्यांना सेलिआक रोग आहे त्यांच्यासाठी ज्वारीचे पीठ हा एक उत्तम पर्याय आहे कारण ते ग्लूटेन-मुक्त आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)