Samosa : चटकदार, लज्जतदार ‘समोसा’ कोणच्या गावचा? इतक्या दुरून देशात आला, आता खवय्यांचा झाला लाडका

Samosa History : समोसा पाहताच तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. समोसा हा खवय्यांचा वीक पॉईंट आहे. पण भारतीय खाद्य संस्कृतीत रुजलेला समोसा भारतीय नाही बरं का? तर तो लांबचा टप्पा पार करून भारतात आला आहे.

Samosa : चटकदार, लज्जतदार समोसा कोणच्या गावचा? इतक्या दुरून देशात आला, आता खवय्यांचा झाला लाडका
समोसा कोणच्या गावचा
| Updated on: Jul 22, 2025 | 4:23 PM

समोसा पाहताच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय काही राहत नाही. लज्जतदार, खुशखुशीत समोसा हा खवय्यांचा वीक पॉईंट आहे. भारतीय खाद्य संस्कृतीत स्ट्रीट फूडमध्ये, हॉटेलमध्ये कचोरी इतकीच समोस्याची मागणी अधिक आहे. हा कुरकुरीत समोसा खाल्ला नाही की काहीतरी हरवल्यासारखे वाटते. सर्वसामान्याचं नाही तर बॉलिवडूचे अनेक सेलेब्रिटींचा समोसा हा आवडीचा खाद्यपदार्थ आहे.

फॅशन आयकॉन आणि बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने कपिल शर्मा शोमधये तिचा आवडता खाद्यपदार्थ समोसा आहे. एकदा तर तिने एका दिवशी 40 समोसे खाल्ल्याची आठवण तिने काढली. तर प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करणारा ऋतिक रोशन याने पण एका मुलाखतीत समोसा हा त्याचा वीक पॉईंट असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाले की, त्याने एकावेळी 12 समोसे खाल्ले होते.

मग समोसाचे गाव तरी कोणचं?

पण तुम्हाला माहिती आहे का, समोसा हा काही भारतीय खाद्य पदार्थ नाही. भारतात हा खाद्यपदार्थ इतर देशातून आला आहे. खाद्यसंस्कृतीची मुशाफिरी केली तर लक्षात येते की समोसाने भारतात येण्यासाठी लांबचा पल्ला गाठला आहे. त्याची सुरुवात इराणमध्ये झाली आहे. तर समोसा हा आपल्याकडे इराण या देशातून आला आहे. तिथे त्याला संबूसाग असे म्हणतात.

IANS च्या एका अहवालानुसार, 11 व्या शतकात इराणी इतिहासकार अबुल फजल बैहाकी याने त्याचे पुस्तक ‘तारीख-ए-बैहाकी’ मध्ये या डिशचा उल्लेख केला आहे. त्याच्या पुस्तकातील वर्णनानुसार, समोसा तिथे किमा आणि काजू घालून तो शाही पाहुण्यांना देण्यात येत असे. तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे होते. समोसा तेव्हा तेलाच तळल्या जात नव्हता अथवा त्याला भट्टीतही शेकले जात नव्हते. 13-14 व्या शतकात मध्य आशियातून व्यापारी आणि मुस्लीम आक्रमक भारतात आले तेव्हा त्यांच्या सोबत समोसा भारतात आला आणि भारतीय खाद्य पदार्थ त्याने लागलीच मानाचे स्थान पटकावले. ‘आइन-ए-अकबरी’ मध्ये सुद्धा त्याचा शाही पंच पकवानात त्याचा उल्लेख आहे. 17 व्या शतकात जेव्हा पोर्तुगालांनी भारतात आलू, बटाटा आणला. तेव्हा आलू समोसा प्रसिद्ध झाला.