DA Hike : रक्षाबंधनापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! इतका वाढणार महागाई भत्ता
DA Hike : केंद्र सरकारकडून रक्षाबंधनापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईशी दोन हात करण्यासाठी बळ मिळण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात 2 टक्के डीए वाढवण्यात आला होता. त्यामुळे 53 टक्क्यांहून त्याने 55 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

central government employees : केंद्र सरकारकडून रक्षाबंधनापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे. सरकारने 7 व्या वेतन आयोगातंर्गत महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा पूर्वीच केली आहे. सरकार जुलै 2025 मध्ये 3-4 टक्क्यांचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना देऊ शकते. यापूर्वी मार्च महिन्यात 2 टक्के डीए मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर डीए 53 टक्क्यांहून वाढून 55 टक्क्यांवर आला आहे.
महागाईचा आलेख पाहता, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता देते. हा महागाई भत्ता 1 जानेवारीपासून लागू होतो. तर दुसरा महागाई भत्ता हा 1 जुलैपासू लागू होतो. आता काही महिन्यांपूर्वी जो महागाई भत्ता जाहीर झाला होता. तो 1 जुलै 2025 रोजीपासून लागू होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना DR देण्यात येतो.
कसा तयार होतो महागाई भत्ता?
अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधारे केंद्र सरकार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करते. महागाईत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होते. AICPI निर्देशांक हा 88 औद्योगिक केंद्रोच्या 317 बाजारातील किरकोळ किंमतींवर आधारीत असतो. डीए जाहीर करण्यापूर्वी सरकार मागील 6 महिन्यांचे आकडेवारी तपासून पाहते.
मार्च 2025 मध्ये AICPI-IW 143 होता. मे 2025 मध्ये तो वाढून 144 झाला. त्यामुळे महागाई भत्त्यात 3-4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. महागाई भत्ता हा या आकडेवारी आणि गणितीय सूत्राआधारे काढण्यात येतो. महागाई भत्ता (%) = [(गेल्या 12 महिन्याचा CPI-IW सरासरी 261.42) ÷ 261.42] × 100
केंद्र सरकारने अद्याप मे 2025 मधील CPI-IW चा डेटा प्रसिद्ध केलेला नाही. जर महागाईचा आलेख उंचावला अथवा तो स्थिर राहिला तर महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जर आकडे उतरले तर महागाई भत्त्यात फरक दिसून येईल. महागाई भत्ता पण अधिक असेल असा दावा करण्यात येत आहे. यावर्षी दोनदा जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाईच्या आधारे महागाई भत्त्यात वाढ करण्यात येईल. यापूर्वी जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात वाढीची घोषणा करण्यात आली होती.
