वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात, मग आजच आहारामध्ये बडीशेपचा समावेश करा

| Updated on: Mar 13, 2021 | 10:37 AM

‘बडीशेप’ हा घटक जवळजवळ प्रत्येक घरात असतो. बडीशेप मुख्यतः माऊथ फ्रेशनर अर्थात मुखवास म्हणून वापरली जाते.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात, मग आजच आहारामध्ये बडीशेपचा समावेश करा
Follow us on

मुंबई : ‘बडीशेप’ हा घटक जवळजवळ प्रत्येक घरात असतो. बडीशेप मुख्यतः माऊथ फ्रेशनर अर्थात मुखवास म्हणून वापरली जाते. बडीशेपच्या गोड चव आणि सुगंधामुळेच लोक ती माऊथ फ्रेशनर म्हणून वापरतात. बडीशेप विविध पदार्थांची चव वाढवण्यासोबतच औषध म्हणून देखील वापरली जाते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? लठ्ठपणा कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया….(Saunf benefits Eat saunf for weight loss)

मुख्यतः अन्नाची चव वाढविण्यासाठी बडीशेप मसाला म्हणून वापरली जाते. रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणी जेवनानंतर बडीशेप दिली जाते. यामुळे जेवण व्यवस्थित पचते. याशिवाय बडीशेपमध्ये पोषक तत्त्वे आढळतात, जी माणसाला निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाची असतात. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी असून त्यात कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक खनिज पदार्थांचा समावेश आहे.

बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. यात असलेले आवश्यक तेल आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत.

बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते. म्हणूनच बडीशेप दूध हे पोटातील आजार बरे करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. यात असलेल्या अ‍ॅस्ट्रॅगल आणि अ‍ॅनिथोलमुळे, हे गॅस, वेदना आणि जठरासंबंधी विकार यांसारख्या पोटाच्या आजारांसाठी एक प्रभावी औषध मानले जाते. मसालेदार जेवणामुळे होणारी जळजळ आणि आतड्यांची सूज कमी करण्यासाठी बडीशेप प्रभावीपणे कार्य करते.

संबंधित बातम्या : 

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Saunf benefits Eat saunf for weight loss)