Skin Care tips | त्वचेच्या सौंदर्याचं रहस्य ‘लिंबू’ आणि ‘मध’, ठिकवून ठेवेल त्वचेचं तारुण्य!

| Updated on: Dec 22, 2020 | 12:15 PM

महागड्या उत्पादनांपेक्षा आपल्या प्रत्येकाच्याच घरात असणारे लिंबू आणि मध हे त्वचेसाठी अधिक लाभदायी ठरतात.

Skin Care tips | त्वचेच्या सौंदर्याचं रहस्य ‘लिंबू’ आणि ‘मध’, ठिकवून ठेवेल त्वचेचं तारुण्य!
लिंबू आणि मध
Follow us on

मुंबई : आपण नेहमीच तरुण दिसावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. त्वचा नेहमीच नितळ दिसावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात त्वचेची काळजी घेणे बऱ्याचदा शक्य होत नाही. धावपळीच्या या युगात लोक स्वतःची काळजी घेण्यास देखील असमर्थ आहेत. दररोज लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने अस्वस्थ असतात. जर, तणाव अधिक वाढू लागला असेल, तर तो आपल्या चेहऱ्यावर देखील दिसू लागते (Skin Care Tips using Lemon And Honey).

वयाच्या एका टप्प्यावर मुरुमं, सुरकुत्या, फ्रीकल आणि डार्क सर्कल या सर्व गोष्टी आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतात. यातून मुक्त होण्यासाठी लोक हजारो रुपये किंमतीच्या महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात आणि त्यांची खिसे रिकामे करतात. ही उत्पादने रासायनिक घटकांनी बनवलेली असतात, ज्यामुळे आपल्या चेहर्‍याची हानी देखील होऊ शकते.

या महागड्या उत्पादनांपेक्षा आपल्या प्रत्येकाच्याच घरात असणारे लिंबू आणि मध हे त्वचेसाठी अधिक लाभदायी ठरतात. आज आपण याच फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. लिंबू आणि मध आपल्या त्वचेसंबंधित समस्या कमी करण्यास मदत करतात.

हे उपाय करून पाहा :

– बेसन पीठामध्ये लिंबाचा रस मिसळून शरीरावर लावल्याने शरीरातील अवांछित केसांची वाढ कमी होते. तसेच, त्वचेचा रंग हलका होऊ लागतो.

– लिंबू आपल्या त्वचेचे पोर्स स्वच्छ करून, ते बंद करण्यात मदत करतो.

– लिंबाचा रस सैल झालेल्या त्वचेला पुन्हा घट्ट करतो आणि त्वचा तरुण दिसू लागते.

– मध आणि लिंबू एकत्र मिसळून चेहऱ्याला लावल्याने त्वचेचा रुक्षपणा कमी होतो. तसेच, यामुळे आपली त्वचा मुलायम राहते आणि त्वचेतील आर्द्रता टिकून राहते.

– लिंबू आणि मधाचा फेसपॅक 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील लव निघून जाते आणि त्वचा नितळ बनते.

या सर्व उपायांचा अवलंब करुन आपण आपल्या त्वचेचे तारुण्य टिकवून ठेवू शकता. परंतु, त्यासाठी तुम्ही काही नियमांचे नियमित पालन करणे महत्वाचे आहे, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या या समस्या दूर होतील (Skin Care Tips using Lemon And Honey).

 

लिंबाचे इतर फायदे

– लिंबाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात. तसेच, कर्करोगाचा धोका कमी होतो.

– लिंबूपाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरात ‘व्हिटामिन-सी’ची कमतरता पूर्ण होते. तसेच, लिंबू आपल्या त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाचा प्रभाव देखील कमी करतो.

– लिंबूपाण्यामध्ये फ्लाव्हानॉइड्स, फिनोलिक अॅसिडस् आणि अशी इतर अनेक तेलं आहेत, जी आपल्या शरीराच्या पेशी खराब करणाऱ्या फ्री रॅडिकल्सविरूद्ध लढतात.

– लिंबूपाणी पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते, जी तुम्हाला बर्‍याच प्रकारच्या हंगामी रोगांपासून वाचवते.

– लिंबामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स तुमची हाडे, यकृत, स्तन, कोलन आणि पोट कर्करोगापासून शरीराचे संरक्षण करतात.

– तसेच लिंबामध्ये एक विशेष प्रकारचे रसायन आढळते. जे आपल्या मेंदूच्या पेशींना विषारी पदार्थांपासून वाचवते, ज्यामुळे अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या रोगांचा धोका देखील कमी होतो.

(Skin Care Tips using Lemon And Honey)

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

हेही वाचा :