AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonia Gandhi Saree : 15 ते 30 दिवसांत तयार होते ही खास साडी; सोनिया गांधींच्या पसापल्ली संबलपुरीची अनोखी कहाणी

सोनिया गांधींच्या पसापल्ली संबलपुरी साडीने भारतीय वस्त्रपरंपरा पुन्हा चर्चेत आणली आहे. ओडिशातील कारागिरांनी हजारो धागे विणून तयार केलेली ही साडी तिच्या ‘पासा’ म्हणजेच चौकटींच्या डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. हातानं विणलेल्या या साड्यांना GI टॅग मिळाल्यामुळे त्यांची ओळख आणि प्रतिष्ठा वाढली आहे.

Sonia Gandhi Saree : 15 ते 30 दिवसांत तयार होते ही खास साडी; सोनिया गांधींच्या पसापल्ली संबलपुरीची अनोखी कहाणी
सोनिया गांधी यांच्या साडीचे खास वैशिष्ट्य
| Updated on: Jul 24, 2026 | 3:14 PM
Share

Sonia Gandhi Pasapalli Sambalpuri saree : भारतीय राजकारणातील क्लासिक आणि एलिगंट लुक्सची चर्चा होते, किंवा तो विषय निघतो तेव्हा अनेक महिला राजकारण्यांसोबत, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचं नाव आवर्जून घेतलं येतंच. त्यांच्या हँडलूम साड्यांचा संग्रहातून पक्त त्यांच्या साधेपणाचं दर्शन होत नाही तर त्यातून भारताच्या समृद्ध वस्त्रपरंपरेलाही उजाळा मिळतो. अलीकडेच त्यांचा लाल-काळ्या रंगातील एक आकर्षक साडी लुक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलंत, तर या साडीवरील चौकटींची (चेकरबोर्ड) पारंपरिक रचना आणि तिची अनोखी विण पाहताच ती सर्वसामान्य साडी नसल्याचे लक्षात येतं. ती साडी म्हणजे ओडिशातील प्रसिद्ध पसापल्ली संबलपुरी इकत साडी. तिच्या प्रत्येक धाग्यामागे कारागिरांची मेहनत, कौशल्य आणि अनेक पिढ्यांची परंपरा दडलेली आहे. या साडीमागे अनेक वर्षांचा इतिहास आहे. जाणून घेऊया सोनिया गांधी यांचा सिग्नेचर लूक असलेल्या या साडीची कहाणी…

पसापल्ली संबलपुरी साडी म्हणजे काय?

ही साडी तयाकर करण्यासाठी खूप मेहनत लागते. ‘पसापल्ली’ हा शब्द संस्कृतमधील ‘पासा’ या शब्दापासून तयार झाल्याचे मानले जाते. चौरस किंवा बुद्धिबळाच्या पटासारखा दिसणारा चौकटींचा नमुना ही या साडीची सर्वात खास ओळख आहे. पारंपरिक पसापल्ली साड्यांमध्ये लाल, काळा आणि पांढरा या रंगांचे आकर्षक कॉम्बिनेशन दिसून येतं. हे रंग ओडिशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचे प्रतीक मानले जातात. या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनमुळे ही साडी इतर संबलपुरी साड्यांपेक्षा खूपच वेगळी ठरते. विशेष म्हणजे, ही साडी प्रामुख्याने ओडिशातील बरगड, सोनपूर, बौध आणि बलांगीर या भागांत, खास हातमागावर विणली जाते.

किती दिवसांचा लागतो वेळ ?

संबलपुरी साडी ही छापील (प्रिंटेड) नव्हे, तर त्यावर अत्यंत बारकाईने विणलेली कलाकृती असते. या साडीवर नक्षी नंतर छापली जात नाही, तर विणकाम सुरू होण्यापूर्वीच ताना आणि बाण्याचे धागे (Warp and Weft) विशिष्ट पद्धतीने बांधून रंगवले जातात. विणकर प्रत्येक धाग्याचे अचूक नियोजन करतात. त्यामुळे विणकाम पूर्ण होताच ‘पासा’, फुले, शंख, चक्र अशा पारंपरिक नक्षी आपोआप साडीवर उमटतात. ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ असून एक पसापल्ली संबलपुरी साडी तयार करण्यासाठी साधारणपणे 2 ते 3 विणकरांना 15 ते 30 दिवस लागतात. काही खास डिझाइन्ससाठी याहूनही अधिक कालावधी लागू शकतो.

GI टॅगमुळे मिळाली ओळख

संबलपुरी हँडलूमला भारतात जिओग्राफिकल इंडिकेशन (GI) टॅग मिळाला आहे. त्यामुळे या विणकामाची खरी ओळख आणि अस्सलपणा ओडिशातील स्थानिक कारागिरांशी जोडला गेला आहे. GI टॅगनंतर देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या साड्यांची मागणी आणि प्रतिष्ठा वाढली आहे.

पसापल्ली संबलपुरी साडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती कधीच कालबाह्य किंवा ऑऊट ऑफ फॅशन होत नाही. ऑफीसचा कार्यक्रम असो किंवा, सण-उत्सव, कौटुंबिक समारंभ किंवा औपचारिक सोहळे अशा प्रत्येक प्रसंगी ही साडी नेसल्यावर तितकीच उठून दिसते. याच कारणामुळे अनेक राजकारणी, कलाकार आणि हँडलूमप्रेमी या साडीला आपल्या वॉर्डरोबमध्ये मानाचे स्थान देतात. आजची तरुणाईही सिल्व्हर किंवा ऑक्सिडाइज्ड दागिने आणि आधुनिक ब्लाउज डिझाइन्ससोबत ही पारंपरिक साडी परिधान करून पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुंदर मिलाफ साधताना दिसते.

ही साडी केवळ परिधान करण्यासाठीचे वस्त्र नाही, तर आपल्या सांस्कृतिक वारशाचा, कारागिरांच्या कष्टांचा आणि शतकानुशतके जपलेल्या विणकामाच्या परंपरेचा जिवंत दस्तऐवज आहे. सोनिया गांधींच्या या साडीने पुन्हा एकदा भारतीय हँडलूमची श्रीमंती अधोरेखित केली आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप