Beauty Tips : चमकदार आणि सुंदर त्वचा मिळविण्यासाठी घरी ‘या’ प्रकारे फेस शीट तयार करा !

| Updated on: May 27, 2021 | 1:02 PM

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन विविध उपचार घेतात.

Beauty Tips : चमकदार आणि सुंदर त्वचा मिळविण्यासाठी घरी या प्रकारे फेस शीट तयार करा !
आपले केस कमी वयात पांढरे होत असतील तर आपण आवळ्याचे तेल केसांना लावू शकतो. यामुळे केस पांढरे होणार नाहीत. आवळ्याचे तेल केसांना लावल्यामुळे केस मजबूत आणि चमकदार बनतात. आवळ्याचे तेल घरी तयार करण्यासाठी आपल्याला गुलाबपूड, आवळा आणि खोबऱ्याचे तेल लागणार आहे. सर्वात अगोदर आवळे बारीक करून घ्या आणि त्यामध्ये गुलाबपूड आणि खोबरेल तेल मिक्स करा आणि केसांना लावा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Follow us on

मुंबई : सुंदर आणि चमकदार त्वचा मिळण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन विविध उपचार घेतात. त्याचा परिणाम काही दिवसांपर्यंत दिसून येतो. मात्र, त्यानंतर त्वचा निर्जीव आणि काळपट दिसू लागते. त्यामध्येही सध्या असलेल्या लाॅकडाऊनमुळे महिलांना त्वचेकडे जास्त लक्ष देणे शक्य होत नाही. यामुळे त्वचा अधिकच खराब होत जाते. मात्र, सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी पार्लरमध्येच जावे असे काही नाही. आपण घरगुती उपाय करून देखील आपली त्वचा सुंदर आणि मुलायम करू शकतो. (Special tips for making face sheets at home to get glowing and beautiful skin)

शीट मास्क तयार करा

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी शीट मास्क अधिक फायदेशीर असतो. शीट मास्क घरच्या घरी तयार करण्यासाठी दही आणि कोरफड जेल आवश्यक आहे. सर्वप्रथम कोरफड जेल आणि दही मिसळून पेस्ट तयार करा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. जेंव्हा ही पेस्ट थंड होईल. त्यावेळी ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावा. 20 ते 25 हे चेहऱ्यावर तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करत ही पेस्ट चेहऱ्यावरून काढा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. त्यामध्ये असणारी कोरफड त्वचेचे डार्क डाग दूर करण्यास मदत करते. दही त्वचेला मॉइश्चराइझ ठेवते.

अँटी एजिंग मास्क

अँटी-एजिंग मास्क तयार करण्यासाठी, मध आणि तेल आवश्यक आहे. तीन चमचे मधात तेल मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. ही पेस्ट थंड झाल्यावर चेहऱ्याला 20 ते 25 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत पेस्ट चेहऱ्यावरील काढा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा. आपण ही पेस्ट आठवड्यातून 2 ते 3 दिवस लावली पाहिजे. ही पेस्ट आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या पेस्टमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

लिंबू आणि कॉफी फेसपॅक

लिंबूमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे त्वचा चमकदार बनविण्यासाठी कार्य करते. हे फेसपॅक बनविण्यासाठी तुम्हाला एका भांड्यात एक चमचा कॉफी आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळावा लागेल. ते चांगले मिसळावे जेणेकरुन ते एकसारखे मिक्स व्हायला पाहिजे. ही पेस्ट सुमारे 15 मिनिटे चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा. एक चमचा मध आणि कॉफी पावडर घ्या आणि ते ऑलिव्ह ऑईलमध्ये चांगले मिसळा आणि ते आपल्या केसांच्या मुळांना लावा आणि कमीत कमी अर्धा तास ठेवा. यानंतर केस शॅम्पूने धुवा. हे पॅक आपले केस हायड्रेटेड ठेवते, तसेच केसांची वाढ सुधारण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Special tips for making face sheets at home to get glowing and beautiful skin)