AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Almond Benefit | मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लाभदायी ‘बदाम’, अशाप्रकारे करा वापर…

आपण आपल्या आहारात मुठभर बदामांचा समावेश करू शकता, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

Almond Benefit | मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लाभदायी ‘बदाम’, अशाप्रकारे करा वापर...
दररोज सकाळी खा भिजलेले 5 बदाम, मेंदूसाठी अधिक फायदेशीर
| Updated on: Feb 17, 2021 | 11:51 AM
Share

मुंबई : आजकाल लठ्ठपणा आणि वजन वाढल्यामुळे बरेच लोक अस्वस्थ आहेत. परंतु या लठ्ठपणामुळे आणि वजन वाढल्यामुळे लोक बर्‍याच आजारांनाही बळी देखील पडत आहेत. तथापि, लोक बाजारपेठेत मिळणारे औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेत आहेत, परंतु ती आपल्या आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारे चांगली ठरत नाहीत (Health benefits of almond can help to control diabetes).

त्याचे बरेच दुष्परिणाम देखील आहेत. मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे, जो भारतात खूप सामान्य होत चालला आहे. चुकीची जीवनशैली आणि अनियंत्रित खाणे, हे याचे मुख्य कारण आहे.

परंतु, जर तुम्ही तुमचा आहार आणि नाश्ता निरोगी असेल, तर मधुमेहाशिवाय तुम्ही इतरही अनेक आजारांना टाळू शकता. यासाठी आपण आपल्या आहारात मुठभर बदामांचा समावेश करू शकता, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. आज आम्ही तुम्हाला बदामाच्या अशाच काही जबरदस्त फायद्यांविषयी सांगणार आहोत…

बदामाचे फायदे :

– बदामांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे, म्हणून मूठभर बदाम सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोकाही वाढत नाही.

– या व्यतिरिक्त, बदाम आपल्या शरीराची चयापचय टिकवून ठेवतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

– दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामांचा समावेश करून आपण टाईप 2 मधुमेहाचा धोका टाळू शकता. बदामांमध्ये उच्च फायबर, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, बदाम कमी ग्लायसेमिक निर्देशांक श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत, ज्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये ग्लूकोजचे प्रमाण बरेच कमी आहे. हेच कारण आहे की, ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास खूप उपयुक्त आहे (Health benefits of almond can help to control diabetes).

– जर आपल्याला हाडांशी संबंधित आजारांना दूर ठेऊन म्हातारपणातही ताठ राहायचे असेल, तर आपल्या आहारात निश्चितपणे कॅल्शियमयुक्त पदार्थ समाविष्ट करा. हाडांसाठी दुग्धजन्य पदार्थ व्यतिरिक्त आपण त्यात बदाम देखील घालू शकता, कारण बदामांमध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते.

– बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.

– बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते, असे नेहमी म्हटले जाते. बदाम खाल्ल्याने फक्त स्मरणशक्तीलाच नाही तर शरीरालाही अजून अनेक फायदे होतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे स्मरणशक्ती द्रृढ करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्याच बरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.

– भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. कारण भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

– बदामातील अँटी-ऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health benefits of almond can help to control diabetes)

हेही वाचा :

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....