AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skincare : ‘या’ समस्या आहेत, तरीही लावताय मुलतानी माती? होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या खास टिप्स…

Skincare : अनेक जण स्किनकेअरसाठी चेहऱ्याला मुलतानी माती लावतत पण सर्वांच्याच स्किनसाठी मुलतानी माती लाभदायक नसते. तर जाणून घ्या कोणी मुलतानी माती लावली पाहिजे आणि कोणी नाही..

Skincare : 'या' समस्या आहेत, तरीही लावताय मुलतानी माती? होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या खास टिप्स...
| Updated on: Oct 21, 2026 | 3:23 PM
Share

Skincare : अनेक जण स्किनकेअरसाठी महागडे प्रॉडक्ट वारतात, तर अनेक लोक मुलतानी मातीचा वापर करतात. चेहरा उजळ करण्यासाठी आणि तेलकटपणा दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करतात… असं अनेकांना वाटतं. त्याचप्रमाणे, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की ती लावल्याने त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी राहते. पण असं नसतं. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते आणि मुलतानी माती प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी योग्य नसते. तिचा चुकीच्या पद्धतीने किंवा वारंवार वापर केल्यास त्वचेमध्ये कोरडेपणा, जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या सगळ्यात प्रश्न असा आहे की, कोणत्या लोकांनी मुलतानी माती वापरू नये? तसेच, तिचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांची त्वचा आधीच कोरडी आहे त्यांनी चेहऱ्याला मुलतानी माती लावणं टाळावं. यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो आणि त्वचेतील घट्टपणा आणि कोरडेपणाची समस्या वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, संवेदनशील त्वचेवर मुलतानी माती लावल्याने जळजळ, खाज किंवा लालसरपणा येऊ शकतो. ती लावल्यानंतर असा त्रास जाणवल्यास, ताबडतोब पाण्याने चेहरा धुवा आणि पुन्हा तिचा वापर करू नका.

एक्झिमा असलेल्या किंवा आधीच जळजळ झालेल्या त्वचेवर मुलतानी माती लावल्याने स्थिती आणखी बिघडू शकते. अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय घरगुती उपाय करू नयेत. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनीही काळजी घेतली पाहिजे. त्वचा तेलकट असली तरी, तिच्यात पाण्याची कमतरता असू शकते. अशा परिस्थितीत, मुलतानी मातीच्या वारंवार वापरामुळे कोरडेपणा वाढू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्यानंतर ती सुकण्याची वाट पाहण्याची गरज नाही. फेस पॅक जास्त वेळ ठेवल्याने त्वचेत घट्टपणा आणि कोरडेपणा येऊ शकतो. तो दररोज लावणं देखील टाळावं. वापरानंतर हलकं मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच, काळजी घ्या आणि चेहऱ्यावर कोणतेही नवीन त्वचेची काळजी घेणारे उत्पादन किंवा घरगुती उपाय लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात