रस्त्यावर सामान विकायची… रातोरात बदलेला लूक पाहून सर्वच थक्क, बॉलिवूडच्या हिरोईनही तिच्यासमोर फिक्या

रस्त्यावर टिशू विकणाऱ्या सकिनाच्या रूपांतराने सर्वांना थक्क केले आहे. एका मेकअप आर्टिस्टने तिचा लूक पूर्णपणे बदलला. डस्की टोनसाठी योग्य मेकअप वापरून तिचे सौंदर्य उलगडले आहे. तिचा नवा ऑफिस लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या लेखात सकिनाच्या रूपांतराची कहाणी आणि डस्की टोनसाठी मेकअप टिप्स दिल्या आहेत.

रस्त्यावर सामान विकायची... रातोरात बदलेला लूक पाहून सर्वच थक्क, बॉलिवूडच्या हिरोईनही तिच्यासमोर फिक्या
रस्त्यावर सामान विकणारीचा रातोरात बदलला लूक
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 24, 2025 | 12:44 PM

प्रत्येकात सौंदर्य उपजतच असतं. फक्त तुम्ही नीटनेटके राहिला पाहिजे. थोडा पैसा आला आणि उंची कपडे घेतले, मेकअप केला की तुमचं सौंदर्य उठून दिसतं. सोशल मीडियावर तर अशा असंख्य लोकांच्या कहाण्या शेअर होत असतात. कुणी रातोरात श्रीमंत झालाय, कुणी रातोरात मोठा गायक झाला, कुणी रातोरात सेलिब्रिटी झाला तर कुणी रातोरात सोशल मीडिया सेन्सेशन झालाय. पण एका तरुणीचा मात्र रातोरात लूक बदलल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. रस्त्यावर सामान विकणाऱ्या या मुलीचे फोटो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यावरच विश्वास बसणार नाही. बॉलिवूडच्या नट्याही तिच्यासमोर फिक्या पडतील असं तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

ज्या मुलीला लोक न पाहता पुढे जायचे आज तिचे फोटो पाहून थक्क होत आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मेकअप, फॅशन आणि आऊटफिट कसा पूर्णपणे बदलू शकतो हे या मुलीच्या टान्सफॉर्मेशनने दाखवून दिलं आहे. ही तरुणी आहे तरी कोण? तिच्या असा बदल कसा झाला? तिला कुणी केली मदत? चला तर जाणून घेऊया.

सर्वच थक्क

‘एक्स’वर जर्नलिस्ट कविश अजीज यांनी रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या या तरुणीचं ट्रान्सफॉर्मेशन शेअर केलं आहे.  ही सकीना आहे, टिश्यू विकायची. एका मेकअप आर्टिस्टने तिला विचारलं की, तुझा मेकअप करायचा असेल तर कोणता लूक करायला तुला आवडेल? त्यावर, सकिना म्हणाली की, मी ट्रॅफिक सिग्नलवर टिश्यू पेपर विकते. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या मुलींशी नेहमी संपर्क येतो. त्यामुळे मलाही ऑफिस लूकच करायला आवडेल. त्यानंतर मेकअप आर्टिस्टने सकिनाचा लूक असा काही बदलला की, तिला पाहिल्यावर ती कोणत्या तरी कार्पोरेट कंपनीची मालकिण आहे, असं वाटतं.

लूकमध्ये काय आहे खास?

सकिनाचा ट्रान्सफॉर्मेशन अफलातून आहे. सकिनाने डस्टी स्किनचा मेकअप केला आहे. त्यावर त्याच शेडचा बेसही ठेवला आहे. मेकअप आर्टिस्टने सकिनाचा डस्की टोन ब्राईट केला नाही हे चांगलंच झालं. सकिनाचे डोळे आधीपासूनच सुंदर आहेत. ग्रे कलरचे आहेत. तिचे डोळे अधिक सुंदर करण्यासाठी मेकअप आर्टिस्टने ब्राऊन स्मोकी आय लूक दिला आहे. पीच ब्लश, ग्लोसी ब्राऊन लिपस्टिकने सकिनाचा लूक पूर्ण करण्यात आला आहे. केसांना कर्ल्स दिलं गेलं आहे. आऊटफिटमध्ये सकिनाने ग्रे कलरची पँट सूट परिधान केलीय. त्यात तू बॉसी व्हाईब देतेय.

 

डस्की टोनसाठी मेकअप टिप्स

डस्की टोन असणाऱ्या महिलांनी मेकअप करताना सर्वात म्हणजे स्किन टोन स्वीकारला पाहिजे आणि त्याचं नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवलं पाहिजे. आपल्या स्किन टोनला मॅच करणारंच फाऊंडेशन वापरलं पाहिजे. लाइट शेड लावल्यावर मेकअप ग्रे होऊ शकतो. ब्लशसाठी पीच, टेराकोटा किंवा डीप रोज शेड्स निवडा. आयशॅडोमध्ये गोल्ड, ब्रॉन्ज, कॉपर आणि प्लम सारखे शेड्स लावा. लिपस्टिक डीप रेड, वाईन, चॉकलेट ब्राऊन किंवा बरगंडी कलर वापरा.