AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Teddy Day : असा तसा नको, प्रेयसीला द्या फक्त याच रंगाचा डेटी बेअर, प्रत्येक रंगाला खास अर्थ

Teddy Bear Colour Meaningm: व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. तुम्ही हा दिवस तुमचे मित्र, प्रियकर, भावंड आणि अगदी शेजाऱ्यांसह देखील साजरा करू शकता. जर तुम्ही सिंगल असाल तर या दिवशी सेल्फ लव्ह देखील केले जाते. कारण, जर तुम्ही आधी स्वतःवर प्रेम केले नाही तर तुम्ही दुसऱ्यावर प्रेम कसे करू शकणार नाही. टेडी बिअरच्या रंगांचे अर्थ काय चला तर मग जाणून घेऊया.

Happy Teddy Day : असा तसा नको, प्रेयसीला द्या फक्त याच रंगाचा डेटी बेअर, प्रत्येक रंगाला खास अर्थ
टेडी डे
| Edited By: | Updated on: Feb 10, 2025 | 8:54 AM
Share

Teddy Bear Colour Meaning: टेडी बिअरचा रंग केवळ त्याचं सौंदर्य वाढवत नाही तर एक सखोल संदेशही देतो. प्रत्येक रंगाची आपली भाषा असते, जी आपल्या भावना व्यक्त करते. त्यामुळे टेडी डेला एखाद्याला टेडी बिअर गिफ्ट करण्यापूर्वी त्याच्या रंगाचं महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे.

10 फेब्रुवारीचा म्हणजेच आजचा दिवस वाया घालवू नका, या प्रसंगी तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना टेडी बिअर भेट द्या. तुम्ही टेडी बिअरच्या रंगाबद्दल निवडक असू शकता म्हणजेच तुमच्या आवडतीचा रंग असू शकतो. पण, टेडीचा रंग वेगवेगळ्या भावना व्यक्त करू करतो. प्रत्येक रंगाच्या टेडीचा अर्थ वेगळा आहे. चला जाणून घेऊया.

निळा रंगाचा टेडी बिअर

निळा रंग विश्वासाचे प्रतीक मानला जातो. तसेच तो प्रेम आणि बांधिलकी देखील वर्णन करतो. म्हणजे आयुष्यातील प्रत्येक चांगल्या-वाईट काळात एकत्र राहण्याचा हेतू असतो.

हिरव्या रंगाचा टेडी बिअर

हिरवा रंग हा रिफ्रेशिंग रंग मानला जातो. पण जेव्हा तुम्ही एखाद्याला या रंगाचे टेडी बिअर गिफ्ट करता तेव्हा तुम्ही त्याची वाट पाहण्यास तयार आहात, असा संदेश त्याद्वारे देण्याचा प्रयत्न करता.

केशरी रंगाचा टेडी बिअर

केशरी रंग ऊर्जा आणि आशेचे प्रतीक मानला जातो. सहसा ज्यांच्याशी तुम्ही भविष्यात संबंध ठेवू इच्छिता त्यांना केशरी रंगाचा टेडी दिला जातो.

गुलाबी रंगाचा टेडी बिअर

गुलाबी रंगाचा टेडी देणे म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी भेट देत असलेल्या व्यक्तीचे कौतुक करायचे आहे, म्हणजेच गुलाबी रंग कौतुकाचे वर्णन करतो. गुलाबी रंग हा मुलींचा सिग्नेचर कलर देखील मानला जातो, त्यामुळे एखाद्या मुलीला गुलाबी टेडी गिफ्ट करणं योग्य आहे.

लाल रंगाचा टेडी बिअर

लाल रंगाचे टेडी बिअर सहसा प्रियकरांना दिले जातात किंवा हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीला भेट म्हणून दिले जातात. लाल रंग प्रेम, उत्कटता आणि उत्तेजना यांचे वर्णन करतो.

टेडी बिअरचा इतिहास आणि महत्त्व

टेडी बिअरचा इतिहास विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर (US President Theodore) “टेडी” रूझवेल्ट यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले. असं म्हटलं जातं की, एका शिकार प्रवासादरम्यान रूझवेल्ट यांनी अस्वल मारण्यास नकार दिला होता, त्यानंतर व्यंगचित्रकाराने एका व्यंगचित्राच्या माध्यमातून ही घटना चित्रित केली. या घटनेपासून प्रेरणा घेऊन टेडी बिअरचा जन्म झाला. तेव्हापासून टेडी बिअर प्रेम, सुरक्षा आणि आपुलकीचे प्रतीक बनले आहे. हे मुलांचे आवडते खेळणे तर आहेच, पण प्रेमी युगुलांमधील भावना व्यक्त करण्याचे ही माध्यम बनले आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.