आठवड्यातून दोनदा पाणी देऊनही ‘ही’ रोपे घरात राहतात अगदी हिरवेगार आणि टवटवीत

घरामध्ये सुंदर छोटी रोपं लावल्याने तुमचे घर हिरवेगार तर होतेच शिवाय वातावरण ताजेतवानेही होते. चला तर मग आजच्या लेखात आपण अशाच काही झाडांबद्दल जाणून घेऊयात ज्यांना आठवड्यातुन दोनदा पाणी घातले तरी चांगले टवटवीत राहतात.

आठवड्यातून दोनदा पाणी देऊनही ही रोपे घरात राहतात अगदी हिरवेगार आणि टवटवीत
| Edited By: | Updated on: Aug 31, 2025 | 3:04 PM

आपल्या प्रत्येकाच्या घरात एकतरी छोटं रोपं म्हणा किंवा झाडं हे असतंच. घरात रोपं लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते. कारण घरात लावलेले रोपं केवळ घराचे सौंदर्य वाढवतातच, शिवाय अनेक आरोग्यदायी फायदे देखील देतात. अशातच काही लोकांकडे वेळेची कमतरता असते ज्यामुळे जे आवड असूनही घरांमध्ये रोपं लावण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळेस व्यस्त लोकांसाठी आज आम्ही तुम्हाला अशा रोपांबद्दल सांगत आहोत ज्यांना अधिक काळजी घेण्याची गरज भासत नाही. आपल्या कडे अशी काही झाडे आहेत ज्यांना आठवड्यातुन फक्त दोनदा पाणी दिल्याने ते हिरवेगार राहतात.

1. केंटिया पाम हे झाडं दिसायला थोडासा एरिका पामसारखाच असतो. केंटिया पाम हे एक इनडोअर प्लांट आहे, जे तुम्ही बाल्कनीपासून बेडरूमपर्यंत कुठेही ठेवू शकता. तसेच या प्लांटला जास्त पाणी द्यावे लागत नाही. कमी पाणी आणि कमी प्रकाश असतानाही केंटिया पाम हा प्लांट हिरवा राहतो. तसेच हा प्लांट लावल्याने घर थंड राहते.

2. जेड वनस्पती देखील खूप सुंदर आहे. हे लहान दिसणारे रोप घराचे सौंदर्य वाढवते. तुम्ही ते घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी ठेवू शकता. तर या झाडांची काळजी कमी घ्यावी लागते. त्याला दररोज पाणी देण्याचीही गरज नाही. तसेच या प्लांटला जास्त प्रकाशाचीही आवश्यकता नसते.

3. पीस लिली हे पांढऱ्या रंगात फुल खूप सुंदर दिसते. हे प्लांट कमी पाण्यातही बराच काळ हिरवे राहते. घर सजवण्यासोबतच ते हवा शुद्ध करते आणि तणावमुक्तीसाठी देखील खूप चांगले मानले जाते.

4. तुम्ही स्पायडर प्लांट घराच्या आत किंवा बाहेर ठेवू शकता. स्पायडर प्लांटची देखील खूप कमी काळजी घ्यावी लागते. हे रोप कमी पाण्यातही टिकते आणि तीव्र सूर्यप्रकाशात सुकत नाही. ते घरातील हवा शुद्ध करते आणि ऑक्सिजनची पातळी देखील वाढवते.

5. मोहरीचे रोप दिसायला खूप सुंदर दिसते. कमी पाण्यातही हे रोप हिरवे राहते. तुम्ही आठवड्यातून दोनदा पाणी देऊ शकता. याला लहान फुले येतात, जी खूप सुंदर दिसतात.