Face Pack : दाढी असणाऱ्या पुरुषांसाठी हे आहेत अत्यंत उपयोगी ‘घरगुती फेसपॅक’; वापरल्यानंतर तुमच्या त्वचेला होतील अनेक फायदे!

| Updated on: Jun 12, 2022 | 3:14 PM

दाढीच्या लूक टिप्स: दाढीच्या त्वचेवरही पिंपल्स खूप दुखतात आणि ते डाग देखील बनवतात. अशा समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही त्वचेवर फेस पॅक लावू शकता. घरगुती फेस पॅकबद्दल तुम्हाला माहिती असल्यास,त्याचा वापर करून तुम्ही दाढी सह चेहऱयाची चमकही कायम राखु शकता.

Face Pack : दाढी असणाऱ्या पुरुषांसाठी हे आहेत अत्यंत उपयोगी ‘घरगुती फेसपॅक’; वापरल्यानंतर तुमच्या त्वचेला होतील अनेक फायदे!
दाढी
Follow us on

 मुंबई :  दाढी ठेवणं ही आजकाल फॅशन बनली आहे. किशोरांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक पुरुष दाढीने त्यांचा लूक छान बनवत आहेत. या ट्रेंडचे अनुसरण करण्यासाठी, तरुण मुलांसह वयस्कर पुरुषही अनेक युक्त्या वापरत आहेत. ज्या लोकांच्या चेहऱ्यावर केसांची वाढ (Hair growth on the face) चांगली होत नाही, ते केस वाढवण्यासाठी दाढीचे तेल, दाढीचा मास्क किंवा इतर उत्पादने वापरतात. तज्ज्ञांच्या मते, दाढी वाढवून स्टायलिश करणे सोपे आहे, परंतु तिची काळजी घेणे थोडे कठीण आहे. चेहऱ्यावर साचलेल्या धूळ किंवा तेलामुळे मुरुम येण्याचा धोका असतो आणि दाढी ठेवणाऱ्या लोकांनाही त्वचा स्वच्छ (Cleansing the skin) ठेवण्यात समस्या येतात. दाढीच्या त्वचेवरील पिंपल्स खूप दुखतात आणि त्यामुळे डागही पडतात. अशा समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही त्वचेवर फेस पॅक लावू शकता. दाढी असणाऱया तरुणांनी कोणते फेसपॅक वापरावे आणि त्वचेवर कशाप्रकारे त्याचा उपयोग करावा याबाबत तुम्हाला माहिती असल्यास, दाढीचा लुकही (The look of a beard)कॅरी करायला सोयीस्कर ठरते.

मुलतानी माती आणि गुलाबजल

तुम्ही मुलतानी मातीने त्वचा खोलवर स्वच्छ करू शकता. दुसरीकडे, गुलाबपाणी त्वचेला ताजे ठेवण्यासोबतच ते चमकदार बनवते. चेहऱ्यावरील पिंपल्स टाळण्यासाठी मुलतानी मातीचा फेस पॅक लावावा. एका भांड्यात तीन ते चार चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात थोडे गुलाबजल मिसळा. माती ओलसर करण्यासाठी त्यात पाणी घाला. दाढीच्या वरच्या त्वचेवर लावा आणि कोरडे होऊ द्या.

कॉफी आणि दही

कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. दह्यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे त्वचेला पोषण मिळते. एका भांड्यात एक दही घ्या आणि त्यात एक चमचा कॉफी घाला. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा होऊ द्या. थोड्या वेळाने एका भांड्यात पाणी घेऊन हात भिजवल्यानंतर चेहऱ्याला मसाज करा. हा पॅक स्क्रब म्हणूनही काम करेल. असे आठवड्यातून दोनदा करा आणि तुम्हाला चेहऱ्यावर फरक दिसू लागेल.

हे सुद्धा वाचा

लिंबु आणि मध

दाढीमुळे चेहरय़ावरील चमक कमी दिसत असेल आणि त्वचाही निस्तेज दिसत असेल तर, लिंबु आणि मधापासून तयार केलेला फेसपॅक तुमच्यासाठी उपयोगी ठरतो. एक चमचा लिंबाच्या रसात अर्धा चम्मच मध मिसळा आणि हा फेसपॅक काही मिनीटे चेहऱयावर तसाच राहु द्या. वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. तुम्हाला तुमचा चेहरा अधिक चमकदार आणि तजेलदार झाल्याचे जाणवेल.