या चुकांमुळे उन्हाळ्यात झेलावा लागतो केसगळतीचा त्रास, बचावाचे उपाय शिकून घ्या

Hair Fall in Summer : उन्हाळ्यात केसांची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते कारण याच ऋतूत केस गळण्यास सुरुवात होते.

या चुकांमुळे उन्हाळ्यात झेलावा लागतो केसगळतीचा त्रास, बचावाचे उपाय शिकून घ्या
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 4:58 PM

नवी दिल्ली : काही लोकांना उन्हाळ्यात केस गळण्याची (hair fall problem)समस्या भेडसावत असते. या हंगामात हवा उष्ण असते. गरम हवेच्या संपर्कात आल्याने केस कोरडे होतात. कोरडे केसही लवकर कमकुवत होतात. कमकुवत केस (weak hair) लवकर तुटतात. या ऋतूमध्ये वाईट सवयींचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. सतत केस गळल्यामुळे तुम्हाला टक्कल पडू शकता. टक्कल पडण्याची सुरुवात डोक्याच्या पुढच्या आणि बाजूने होते. टक्कल पडल्यास पुरुषांमध्ये केसांची रेषा हळूहळू कमी होते. त्याच वेळी, महिलांमध्ये भांगाच्या आसपास केस कमी होऊ लागतात. हळूहळू ही समस्या वाढत जाते आणि केस बारीक आणि पातळ होऊ लागतात. केस गळणे वेळेवर थांबवणे आवश्यक आहे. केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी खाली दिलेल्या टिप्सबद्दल विचार करा

उन्हाळ्यात केस गळण्याची कारणे

1) स्काल्पची स्वच्छता न करणे

उन्हाळ्यात स्काल्पची स्वच्छता न केल्यामुळे केस गळतात. केसांची स्वच्छता न केल्यामुळे घाम, तेल आणि घाण टाळूवर चिकटते. उन्हाळ्यात, शांपूने स्काल्प स्वच्छ करणे पुरेसे नाही. ज्याप्रमाणे त्वचेला एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे, त्याच प्रकारे स्काल्प देखील एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. कोरफड, मध, दही इत्यादी हेअर पॅक केसांवर आठवड्यातून दोनदा लावावेत.

2) केस घट्ट बांधणे

तुम्हालाही नेहमी केस बांधून ठेवायला आवडतात का? या सवयीमुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. खरं तर, उन्हाळ्यात केस खूप घट्ट बांधल्यामुळे, घाम केसांमध्ये अडकतो. या कारणास्तव, बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे केस गळणे आणि कोंडा होऊ शकतो.

3) ऊन आणि प्रदूषण

सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने आणि प्रदूषणामुळे केस कमकुवत होतात. अतिनील किरणांमुळे केसांची आर्द्रताही कमी होते. केसांमध्ये ओलावा नसल्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. बाहेर जात असल्यास केसांना टोपी किंवा स्कार्फने झाकून ठेवा. तसेच, केस फक्त सौम्य शांपूने स्वच्छ करा.

4) दररोज केस धुणे

उन्हाळ्यात दररोज आंघोळ करणे ही चांगली सवय आहे. पण केस रोज धुवू नयेत. केसांना रोज शांपू आणि कंडिशनर लावल्याने केसांची मुळं कमकुवत होतात. उन्हाळ्यात केस आठवड्यातून 2 ते 3 वेळा धुवा.

5) पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे

पुरेसे पाणी न प्यायल्याने केस गळण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात हायड्रेशनची काळजी न घेतल्याने केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. पाण्याच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

केसगळती कशी रोखावी ?

केस गळायला सुरुवात झाली असेल तर या सोप्या टिप्सचे पालन करा

– एसीच्या हवेत जास्त वेळ राहू नका.

– केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका.

– केसांवर जास्त हीटिंग मशीन वापरू नका.

– टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करा.

– फायबर, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचे सेवन करा.

– दिवसातून 2 ते 3 वेळा केस कंगव्याने विंचरा. या सवयीने केस अडकून तुटणार नाहीत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.