
वातावरणातील बदल आणि दमट हवामान यामुळे यासर्वांचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ आणि मुरूम यांसारख्या समस्या निर्माण होत असतात. अशातच त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी लोकं अनेकदा फेस टोनर वापरतात. अशावेळेस बहुतेकजण हे बाजारात उपलब्ध असलेले महागडे टोनर खरेदी करतात तसेच केमिकल बेस्ड असतात, ज्यामुळे कधीकधी ते त्वचेच्या समस्या निर्माण करतात. यासाठी तुम्ही नैसर्गिकरित्या टोनरचा वापर करून त्वचा चमकदार बनवा. चला तर मग जाणून घेऊया घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही नैसर्गिक फेस टोनर कसा बनवू शकता.
फेस टोनर हे एक प्रकारचे द्रव आधारित त्वचेची काळजी घेणारे उत्पादन आहे. जे चेहरा स्वच्छ केल्यानंतर लावले जाते. ते त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. तसेच त्वचेच्या छिद्रांना घट्ट करण्यास मदत करते. म्हणून तुम्ही घरी सोप्या पद्धतीने फेस टोनर बनवू शकता.
1. तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगर वापरून फेस टोनर देखील बनवू शकता. ते बनवण्यासाठी, एक कप अॅपल सायडर व्हिनेगर तीन कप पाण्यात मिक्स करा. नंतर तयार टोनर स्प्रे बाटलीत भरून ठेवा. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे मुरुम कमी करण्यास मदत करतात. या फेस टोनरचा वापर केल्याने तुमची त्वचा मऊ आणि गुळगुळीत होईल.
2. तुम्ही गुलाब पाण्याने सुद्धा फेस टोनर तयार करू शकता. ते त्वचेच्या पीएच पातळीला संतुलित करण्यास मदत करते. कारण गुलाब पाण्याचे पीएच 4-5 च्या दरम्यान असते जे त्वचेच्या पीएच पातळीइतके असते. गुलाबपाणीचा फेस टोनर त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिक्स करून तुम्ही फेस टोनर तयार करू शकता. तर हा टोनर तुम्ही सकाळी आणि रात्री चेहऱ्यावर लावू शकता.
3. तुम्ही कोरफड आणि व्हिटॅमिन ई वापरून फेस टोनर बनवू शकता. कोरफड त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन ई वृद्धत्वविरोधी चिन्हे कमी करण्यास मदत करते. तर हा फेस टोनर बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊल मध्ये कोरफड जेल घ्या आणि नंतर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि गुलाबपाणी मिक्स करा. तयार टोनर बाटलीत भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
4. तुम्ही ग्रीन टी पासून टोनर तयार करू शकता. तर यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात पुरळ आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात आणि त्वचा चमकदार बनवतात. हा टोनर बनवण्यासाठी पाणी उकळवा आणि नंतर त्यात ग्रीन टी मिक्स करा. थंड झाल्यावर हे पाणी बाटलीत भरून ठेवा. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी ग्रीन टी पासून तयार टोनर सर्वोत्तम आहे.
5. काकडीत थंड आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात जे उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. काकडीचे लहान तुकडे करा आणि नंतर मिक्सच्या भांडयात टाकुन बारिक करा. यानंतर त्यातील रस काढून स्प्रे बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही काकडीपासून तयार केलेला हा फेसटोनर चेहऱ्यावर दोनदा लावू शकता. काकडीत 95 टक्के पाणी असते जे त्वचेला थंड करते आणि सनबर्नवर उपचार करण्यास मदत करते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)