Vastu Shastra : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरात आणा या 5 वस्तू, घरात येईल पैसाच -पैसा
वास्तुशास्त्र हे असं शास्त्र आहे, जे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन मुख्य आधारावर कार्य करतं, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात काही अशा वस्तू असतात ज्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडत असतो, अशाच काही वस्तुंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात अशा काही वस्तू असतात ज्यांचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडत असतो, तर त्याचवेळी घरात अशा देखील काही वस्तू असतात ज्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. आपल्या घरात अनेक शुभ परिणाम देणाऱ्या गोष्टी असतात परंतु त्या गोष्टी योग्य त्या स्थानी ठेवल्या गेल्या पाहिजेत तरच त्याचा अपेक्षित परिणाम साध्य होतो, अन्यथा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. आता 2025 संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, लवकरच आपण नव्या वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत. येणारं वर्ष आपल्याला आनंदाचं जावं, सुखा,समाधानाचं जावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, नवीन वर्ष चांगलं जावं यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी जर या गोष्टी केल्या तर त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
लक्ष्मी मातेची मूर्ती – जर तुमच्या घरात लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा प्रतिमा आणा, लक्ष्मी मातेची दररोज सकाळी पूजा करा, यामुळे घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होऊन, घर धनधान्य आणि पैशांनी भरून जाईल, तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल.
हत्तीची मूर्ती – घरात हत्तीची मूर्ती असणं खूप शुभ मानलं गेलं आहे, जर घरात हत्तीची मूर्ती असेल तर सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात.
तुळस – जर तुमच्या घरात तुळशीचं झाडं नसेल तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही घरी तुळशीचं रोप आणू शकता, तुळशीची नियमीत पूजा केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
शंख – हिंदू धर्मामध्ये शंखाला विशेष महत्त्व आहे, कोणतीही पूजा शंखाशिवाय अपूर्ण मानली जाते, त्यामुळे शंख हा प्रत्येक घरात असलाच पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं.
पारिजातकाचं झाडं – वास्तुशास्त्रामध्ये पारिजातकाला देखील शुभ मानलं गेलं आहे, दारापुढे पारिजातक असंण शुभ मानलं जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
