
सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन शॉपिंग करत असतात. कारण या दिवसांमध्ये अनेकवस्तुवर मोठी सुट दिली जाते. तर अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स साईटवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जातात. त्यामुळे बहुतेकजण या दोन्ही साईटवर डिस्काउंट आफरचा फायदा घेतात. परंतु अनेकदा प्रत्यक्ष किंमत आणि दाखवण्यात येणाऱ्या सवलती मधील किंमत या दोघांमध्ये तफावत असते. यामुळे अनेकदा ग्राहकांना अचूक माहितीच्या अभावामुळे डिस्काउंटच्या नादात जास्त खर्च करावा लागतो. पण आजच्या या लेखात आपण एखाद्या वस्तूची योग्य किंमत काय ती कशी पाहाता येईल हे आपण काही ट्रिक्स व हॅक्सच्या मदतीने जाणून घेऊयात.
किंमत आणि हिस्ट्री टूल्सचा वापर
टेक हॅक्स आणि किंमत ट्रॅकिंग टूल्स वापरल्याने तुम्हाला तुम्ही खरेदी करत असलेल्या वस्तूची खरी किंमत जाणून घेण्यास आणि हजारो रुपये वाचविण्यात मदत होऊ शकते. तर यासाठी काही ऑनलाईन प्राईस हिस्ट्री टूल्स आहेत जसे की, Keepa, CamelCamelCamel आणि Price History हे तुम्हाला खरेदी करत असलेल्या प्रोडक्टची योग्य आणि खरी प्राईस ग्राफ दाखवतात. या टूल्सच्या मदतीने तुम्हाला वस्तुची किंमत गेल्या काही महिन्यांत किती होती आणि सध्याच्या या ऑफरमध्ये खरोखर ती वस्तू खरेदी करणे फायदेशीर आहे की फक्त एक फसवणूक आहे हे याद्वारे समजते. तुम्ही Buyhatke टूल देखील वापरू शकता.
ब्राउझर एक्सटेंशन आणि अॅप्स
अनेक ब्राउझर एक्सटेंशन आणि मोबाईल अॅप्स विशेषतः ई-कॉमर्स साइट्सवरील किंमती ट्रॅक करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर, हे एक्सटेंशन तुम्ही Amazon किंवा Flipkart वर ज्या वस्तू किंवा एखादे प्रोडक्ट पाहता तेव्हा तात्काळ तुम्हला हे एक्सटेंशन त्या वस्तुच्या खऱ्या किंमतीचा डेटा दाखवते, ज्यामुळे बनावट सवलती पासून वस्तू खरेदी करण्यापासून वाचू शकता.
अलर्ट आणि नोटिफिकेशन सेट करणे
जर तुम्ही एखादे उत्पादन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किंमत सूचना सेट करणे हा उत्पादनाची किंमत कमी झाल्यावर सूचना मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. अशा प्रकारे, ग्राहक योग्य वेळी त्यांची खरेदी करू शकतात आणि प्रत्येक वेळी साइट तपासण्याची गरज न पडता खऱ्या सवलतीचा फायदा घेऊ शकतात.