
पावसाळा सुरू झाला की अनेकजण हा मान्सून मस्त एन्जॉय करतात. पण हा ऋतू जितका आल्ल्हाददायक वाटतो तितकाच समस्या निर्माण करणारा देखील आहे. पावसाळ्यात आरोग्यासोबच खाण्यापिण्याच्या समस्या देखील जास्त पाहायला मिळतात. पावसाळ्यात सर्वात जास्त टेन्शन म्हणजे भाजीपाला टिकवणे. कारण पावसाळ्यात भाजीपाला भिजल्याने लवकर खराब होतो.
अशातच पावसाळ्याच्या दिवसात वारंवार बाहेर जाऊन भाजीपाला आणणे शक्य नसते. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने भाज्या फक्त आठवडाभर नाहीतर 15 दिवस टिकून राहील.
1. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारातून विकत घेतलेल्या भाज्या नीट धुवा कारण या ऋतूत ओलाव्यामुळे भाजींवर बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. यासाठी भाज्या फक्त पाण्याने स्वच्छ करण्याऐवजी पाण्यात व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा टाकून त्याने स्वच्छ करा. यामुळे भाज्यांवर असलेली घाण मोठ्या प्रमाणात निघून जाते.
2. भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी भाज्यामधील पाणी पूर्णपणे काढा व कोरडया करा. यासाठी तुम्ही भाज्या पुसण्यासाठी सुती कापड किंवा पेपर टॉवेलचा वापर करू शकता. यामुळे भाज्या व्यवस्थित स्वच्छ होतील. त्या पॉलिथिनमध्ये किंवा बाजारातून आणलेल्या पिशव्यांमध्ये ठेवण्याची चूक करू नका. तर या दिवसात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी आणि दिर्घकाळ टिकवण्यासाठी पेपर टॉवलेमध्ये गुंडाळून ठेवा.
3. लसूण जास्त काळ टिकण्यासाठी हवाबंद पिशवीत तुम्ही त्यात चहाची पाने टाकून ठेवू शकता. असे केल्याने त्याचे लसून बराच दिवस टिकतो आणि लवकर सुकत नाही किंवा खराब होत नाही.
4. पावसाळ्यात कांदा बरेच दिवस टिकून राहावा यासाठी वर्तमानपत्राचे तुकडे कांद्यामध्ये ठेवा. यामुळे कांदा खराब होण्याचा धोका कमी होतो आणि पावसाळ्यात लवकर खराब होत नाही.
5. आले जास्त काळ टिकवण्यासाठी हळदीच्या पाण्यात बुडवा आणि सुकल्यानंतर पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
6. टोमॅटो जास्त काळ टिकवण्यासाठी तुम्ही त्यांची हिरवी पाने काढून त्याच्या वरच्या भागावर टेप लावू शकता. यामुळे टोमॅटो लवकर मऊ होत नाही आणि कुजण्यापासून वाचतात.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)