जयपूरला जायचे नियोजन करत आहात? मग या ठिकाणांना आवश्य भेट द्या

| Updated on: Feb 12, 2022 | 10:03 PM

जयपूर हे राजस्थानमधील पर्यटनासाठी एक प्रसिद्ध असे शहर आहे. जयपूरला पिंक सिटी या नावाने देखील ओळखले जाते. शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दरवर्षी हजारो पर्यटक जयपूर पहाण्यासाठी येत असतात. जयपूरमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, की जी जयपूरला गेल्यानंतर आवर्जून पहावीत. आज आपण अशाच काही पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत.

1 / 5
हवा महल : हवा महलला जयपूरची शान मानले जाते. हा पॅलेस त्याच्या सौंदर्य आणि अनोख्या रचनेमुळे लोकांना आकर्षित करतो. तुम्ही जेव्हा जयपूर फिरण्यासाठी जाल तेव्हा हवा महला आवश्य भेट द्या. या इमारतीचे बांधकाम बघून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

2 / 5
आमेर किल्ला : हा किल्ला अरवली डोंगराच्या माथ्यावर आहे. जयपूरचे सुंदर दृश्य येथून तुम्हाला पाहता येते. ज्यांना छायाचित्राची आवड आहे. अशा लोकांनी हा किल्ला एकदा तरी बघावा असे म्हटले जाते.

3 / 5
जलमहाल : हे एक सुंदर आणि शांत ठिकाण मानले जाते. असे म्हणतात की हे ठिकाण पूर्वी महाराजांचे शूटिंग लाउंज होते. जलमहाल हा पाण्याच्या मधोमध असल्याने दूरून देखील अतिशय सुंदर असा दिसतो.

4 / 5
चोखी ढाणी : 10 एकरात पसरलेल्या या रिसॉर्टमध्ये तुम्ही राजस्थानची संस्कृती आणि चवदार खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता. इथे तुम्हाला प्राचीन कलाकृती, हस्तकला, ​​चित्रे, लोककथा आणि शिल्पांसह पारंपारिक राजस्थानचे वास्तविक चित्रण पहायला मिळते.

5 / 5
बडी छोटी चौपार : जर तुम्हाला शॉपिंगची आवड असेल तर तुम्ही जयपूरच्या या जगप्रसिद्ध मार्केटला देखील भेट देऊ शकता. हे मार्केट राजस्थानी पोशाखांसाठी ओळखले जाते. इथे राजस्थानी पोषाख स्वस्तात मिळतात. विशेष म्हणजे हे मार्केट जयपूर रेल्वे स्टेनच्या जवळच आहे.