Jaipur Tourist Places : जयपूरमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? ‘या’ 6 ऑफबीट ठिकाणांना नक्की भेट द्या!

| Updated on: Sep 24, 2021 | 7:55 AM

जयपूर ज्याला गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. हे राजस्थानच्या शाही राज्याची राजधानी आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. हे ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांना खूप आकर्षित करते. याशिवाय या पिंक सिटीच्या आजूबाजूला अशी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत.

Jaipur Tourist Places : जयपूरमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? या 6 ऑफबीट ठिकाणांना नक्की भेट द्या!
Jaipur
Follow us on

मुंबई : जयपूर ज्याला गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. हे राजस्थानच्या शाही राज्याची राजधानी आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. हे ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांना खूप आकर्षित करते. याशिवाय या पिंक सिटीच्या आजूबाजूला अशी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. जी तुम्ही कदाचित पाहिली नसतील. येथे पर्यटकांची गर्दीही कमी आहे. जयपूर जवळ असलेल्या अनेक ऑफबीट ठिकाणांची माहीती आम्ही तुम्हाला देणार आहोत. (beautiful views of these offbeat places in Jaipur)

गलता मंदिर

गलता मंदिर नैसर्गिक झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. जयपूरमध्ये भेट देण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. या मंदिर परिसरामध्ये अनेक माकडे आहेत. हे दिल्ली-आग्रा महामार्गावर आहे. हे खूप शांत ठिकाण आहे. गलता जी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडा डोंगर चढावा लागेल. हे मंदिर पर्वतांनी वेढलेले आहे. या ठिकाणी एक तलाव देखील आहे.

चांदलाई तलाव

येथे एक सुंदर तलाव आहे. ज्याला स्थलांतरित पक्षी भेट देतात. या तलावावरील नैसर्गिक दृश्यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. हे जयपूरमधील खास ठिकाणांपैकी एक आहे. चांदलाई तलाव कोटा-जयपूर महामार्गावरील टोंक रोडवर आहे. शहराच्या बाहेरील बाजूस वसलेल्या या तलावाला भेट देणे हा जयपूरमधील एक अनोखा अनुभव आहे.

आमेर सागर

जर तुम्ही जयपूर मधील काही अनोखी ठिकाणे शोधत असाल तर तुम्ही आमेर सागर ला जाऊ शकता. हे 17 व्या शतकातील सरोवर आहे. जे आमेर आणि जयगड किल्ल्यांना पाणी पुरवते. हे आमेर किल्ल्याजवळ खीरी गेट आणि अनोखी संग्रहालयाच्या दरम्यान आहे. या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्या आहे.

चुलगिरी जैन मंदिर

अरावलीने वेढलेले सुंदर जैन मंदिर जयपूरमधील ऑफबीट ठिकाणांपैकी एक आहे. दिल्ली-आग्रा महामार्गावर हे एक सुंदर ठिकाण आहे. मंदिरात जाण्यासाठी सुमारे एक हजार पायऱ्या आहेत. हे ठिकाण अतिशय सुंदर आणि मंदिराच्या अजूबाजूचा निसर्ग पाहण्यासारखा आहे.

कानोता धरण

कानोता धरण हे जयपूरमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हे जयपूरपासून 15 किमी अंतरावर आहे आणि पावसाळ्यात सुंदर दृश्य येथे बघायला मिळते.

संबंधित बातम्या : 

अंदमान आणि निकोबार बेटांवर जाण्याचे नियोजन करताय? जाणून घ्या सर्व माहिती फक्त एका क्लिकवर

Hill Stations : कमी बजेटमध्ये भेट देण्यासाठी जयपूरजवळील हिल स्टेशन सर्वोत्तम पर्याय

Karnataka Tourist Places : कर्नाटकमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? या ठिकाणांना नक्की भेट द्या

(beautiful views of these offbeat places in Jaipur)