VIDEO | महाराष्ट्राचे मिनी काश्मीर धुक्यामध्ये हरवले, पर्यटकांचा मात्र हिरमोड

| Updated on: Jun 20, 2021 | 1:55 PM

दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरमध्ये या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येतात. (Maharashtra Mini Kashmir Mahabaleshwar lost in fog)

VIDEO | महाराष्ट्राचे मिनी काश्मीर धुक्यामध्ये हरवले, पर्यटकांचा मात्र हिरमोड
mahabaleshwar
Follow us on

सातारा : थंड हवेचे ठिकाण आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असणारे महाबळेश्वरचे सौंदर्य खुलून निघाले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येथे येत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे महाबळेश्वर पर्यटकांशिवाय ओस पडले आहे. (Maharashtra Mini Kashmir Mahabaleshwar lost in fog)

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. साताऱ्यातील  महाबळेश्वर, सातारा, जावली, कराड, पाटण, कोरेगाव तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. सातारा जिल्हयातील धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे महाबळेश्वरमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे पाऊस आणि धुक्याचा खेळ सुरु आहे.

पर्यटकांचा हिरमोड

महाबळेश्वर हे देशातील अनेक पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरमध्ये या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येतात. सध्या महाबळेश्वरचे सर्वच रस्ते धुक्यामध्ये हरवून गेले आहे.  मात्र महाबळेश्वरमध्ये पर्यटन अद्याप बंदच आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे या ठिकाणी विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच पर्यटनाचे सर्व पॉईंट पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी महाबळेश्वरकडे पाठ फिरवली आहे.

पाहा व्हिडीओ :

(Maharashtra Mini Kashmir Mahabaleshwar lost in fog)

संबंधित बातम्या : 

PHOTO | कणकवलीतील सावडाव धबधबा फेसाळला, लॉकडाऊनमुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड

PHOTO | World’s Most Beautiful Islands : ही आहेत जगातील 5 सर्वात सुंदर बेटे

उन्हाळ्यात फिरायला जायचा प्लान करताय? मग या 5 सुंदर हिल स्टेशनचे पर्याय निवडू शकता