OYO : ओयोकडून 399 रूपयांपासून निवास सुविधा, स्वातंत्र्य दिनानिमित्त एक विशेष ऑफरची घोषणा

| Updated on: Aug 11, 2022 | 10:02 AM

ओयोची ग्राहक मोहिम 'गिव्‍ह युअर वेकेशन ए न्‍यू डेस्टिनेशन'मधून ही माहिती सादर करण्‍यात आली. ऑगस्‍ट महिन्‍यामधील सुट्ट्यांदरम्‍यान पर्यटकांना किफायतशीर निवास व्‍यवस्‍था प्रदान करण्‍यात येणार आहे. जाणून घ्या..

OYO : ओयोकडून 399 रूपयांपासून निवास सुविधा, स्वातंत्र्य दिनानिमित्त एक विशेष ऑफरची घोषणा
OYO कंपनी
Image Credit source: social
Follow us on

नवी मुंबई : जागतिक पर्यटन तंत्रज्ञान कंपनी ओयो (OYO) 11 ते 15 ऑगस्ट 2022 या एक्‍सटेण्‍डेड लाँग वीकेंडसाठी 399 रूपयांपासून सुरू होणार्‍या शुल्कासह निवासावरील किंमती (Price) कमी करण्याची घोषणा केली.स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधनच्या निमित्ताने ओयोचा पर्यटकांना संपूर्ण भारतातील (India) न पाहिलेल्‍या गंतव्‍यांचा शोध घेण्यासाठी, तसेच संपूर्ण भारतातील स्‍थानिक प र्यटन अर्थव्‍यवस्‍थांना फायदा करून देण्‍यासाठी प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे. ग्राहक त्यांचे निवासस्थान बुक करण्यासाठी आणि हॉटेलमध्ये चेक-इनच्या वेळी पैसे देण्यासाठी ‘पे अ‍ॅट हॉटेल’ वैशिष्ट्याचा वापर करू शकतात. जून 2022 मध्ये करण्‍यात आलेल्‍या कंपनीच्या कंझ्युमर सेन्टिमेंट अभ्यासानुसार जवळपास 95 टक्‍के भारतीय आंतरराष्‍ट्रीय ठिकाणांपेक्षा देशांतर्गत सहलींना प्राधान्य देत आहेत. ओयोची ग्राहक मोहिम ‘गिव्‍ह युअर वेकेशन ए न्‍यू डेस्टिनेशन’मधून ही माहिती सादर करण्‍यात आली. ऑगस्‍ट महिन्‍यामधील सुट्ट्यांदरम्‍यान पर्यटकांना किफायतशीर निवास व्‍यवस्‍था प्रदान करण्‍यात येणार आहे.

या ऑफरबाबत सांगताना ओयोचे प्रॉडक्‍टचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व मुख्‍य सेवा अधिकारी श्रीरंग गोडबोले म्हणाले, “भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि तरीही येथील बर्‍याच भागांचा अद्याप शोध घेण्‍यात आलेला नाही. यंदा रक्षांबंधन व स्‍वातंत्र्य दिनाचा आनंद एकत्र घेता येऊ शकतो, जेथे ग्राहकांना कुटुंब, मित्रांसोबत अत्‍यावश्‍यक सहलीवर जाण्‍याची किंवा एकट्याने शांतमय पर्यटनाचा आनंद घेण्‍याची संधी आहे. यंदाचे वर्ष पर्यटन महत्त्वाकांक्षांबाबत राहिले आहे आणि आमची मोहिम भारताच्‍या न पाहण्‍यात आलेल्‍या स्‍थानिक गंतव्‍यांना मानवंदना आहे. आगामी लाँग वीकेण्‍डसह आम्‍ही आशा करतो की, पर्यटक या ऑफरचा वापर करत भारतातील मोहक अशा न पाहण्‍यात आलेल्‍या गंतव्‍यांचा आनंद घेण्‍यासाठी दूरवर प्रवास करतील. तसेच यामुळे लहान नगर व शहरांमधील स्‍थानिक पर्यटन अर्थव्‍यवस्‍थांना चालना देखील मिळेल.”

जून 2022 मध्ये करण्‍यात आलेल्‍या कंपनीच्या कंझ्युमर सेन्टिमेंट अभ्यासानुसार जवळपास 95 टक्‍के भारतीय आंतरराष्‍ट्रीय ठिकाणांपेक्षा देशांतर्गत सहलींना प्राधान्य देत आहेत. ओयोची ग्राहक मोहिम ‘गिव्‍ह युअर वेकेशन ए न्‍यू डेस्टिनेशन’मधून ही माहिती सादर करण्‍यात आली. ऑगस्‍ट महिन्‍यामधील सुट्ट्यांदरम्‍यान पर्यटकांना किफायतशीर निवास व्‍यवस्‍था प्रदान करण्‍यात येणार आहे.

या सवलतीचा लाभ घेण्‍यासाठी ओयो अ‍ॅप डाऊनलोड करा, सवलतीच्‍या दरांमधील हॉटेल स्‍टेचा शोध घ्‍या आणि बुक नाऊ अ‍ॅण्‍ड पे अ‍ॅट हॉटेल बटनावर क्लिक करा.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)