
आता ChatGPT, Microsoft Copilot आणि इतर AI टूल्स फक्त प्रश्नांची उत्तरं देणारे चॅटबॉट राहिले नाहीत, तर ते तुमचं वैयक्तिक ट्रॅव्हल प्लॅनरही बनू शकतात. तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात, कधी जाणार आहात, किती दिवस राहणार आहात यावर आधारित AI तुम्हाला योग्य पॅकिंग लिस्ट, ट्रिपचा संपूर्ण आराखडा आणि बजेटमध्ये बसणारे सर्वोत्तम पर्याय सुचवू शकतो.
फिरायला जाताना काय घ्यावं, किती कपडे घ्यावेत, हवामानानुसार काय गरजेचं आहे, यासाठी तुम्ही AI ला विचारू शकता. तसंच, स्वस्त विमान किंवा ट्रेनचं तिकीट कुठे मिळेल, कोणता प्रवासाचा मार्ग योग्य आहे, याचाही सल्ला AI देतो. तुम्ही एखादं वाक्य टाकलं की AI तुमच्यासाठी एकदम व्यवस्थित योजना तयार करतो.
प्रवास चालू असताना ट्रेनचं लाईव्ह स्टेटस, फ्लाईटची अपडेट्स, PNR स्टेटस जाणून घ्यायचं असेल, तर AI तिथेही मदत करतो. वेळ वाचतो आणि विविध अॅप्स उघडून माहिती शोधायचा त्रास टळतो. ट्रेन रद्द झाली किंवा फ्लाईट लेट झाली, तर AI लगेच पर्यायी मार्गही सुचवतो.
प्रवासात सोबत ठेवायच्या औषधांची यादी, लहान मुलांसाठी विशेष तयारी, गर्दी कशी टाळायची यासारख्या लहान पण महत्त्वाच्या गोष्टींचाही AI चांगला सल्ला देतो. त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुटसुटीत आणि आनंददायी होतो.