Hotel Booking : हॉटेल बुक करताना चूक करताच गेम होणार, 3 गोष्टींची काळजी घ्या अन्यथा…

हॉटेल बुक करताना काही काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण एकदा का चूक झाली तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळेच हॉटेल बुक करण्याआधी काय करावे, हे जाणून घेऊ या...

Hotel Booking : हॉटेल बुक करताना चूक करताच गेम होणार, 3 गोष्टींची काळजी घ्या अन्यथा...
hotel booking
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 06, 2026 | 4:16 PM

Hotel Booking Rules : कुठे फिरायला गेलं की राहण्यासाठी आपण अगोदर हॉटेल बुक करतो. पुढच्या प्रवासासाठी सोईची आणि सर्व सोई-सुविधांनी युक्त असलेले हॉटेल आपण निवडतो. हॉटेलची निवड करताना आपण ऑनलाईन रिव्ह्यूदेखील बघतो. परंतु अनेकवेळा आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष सुविधा वेगळ्याच असतात. काही वेळा तर आपली थेट फसवणूक होते. मनासारखे हॉटेल न भेटल्यामुळे आपली निराशा होते आणि पुढच्या प्रवासाचा उत्साह संपतो. त्यामुळे आपल्याला आवडणारे, हवे तसे हॉटेल मिळावे यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. काही बाबींची विशेष खबरदारी घेतल्यास तुम्हाला हॉटेल बुकिंच्या माध्यमातून होणारी फसवूक थांबवता येईल.

फोन कॉल करून विचारपूस करा

तुम्हाला एखादे हॉटेल बुक करायचे असेल तर फक्त ऑनलाईन रिव्ह्यूवर अवलंबून राहू नका. हॉटेलच्या प्रशासनाला एकदा कॉल जरूर करा. कॉल करून रुम कीती मोठी आहे, काय सोई-सुविधा आहेत याची प्रत्यक्ष चौकशी करा. त्यांतर हॉटेलच्या आजूबाजूला अन्य सुविधा आहेत का? याचीही खात्री करून घ्या.

चेक इन-चेक आऊट टाईम

हॉटेल बुक करण्याआधी चेक इन- चेक आऊट करण्यासंबंधी नियम काय आहेत? ते तपासून पाहा. तुम्ही हॉटेलमध्ये एक तास अगोदर गेले किंवा एखादा तास उशिराने चेक आऊट केले तर तुम्हाला अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार आहेत का? याची खात्री करून घ्या. अनेकदा याबाबतची माहिती हॉटेलच्या संकेतस्थळावर दिलेली नसते. त्यामुळे ऐनवेळी पैसे खर्च होऊ नयेत म्हणून अगोदरच फोन करून सर्वा माहिती मिळवावी.

रिव्ह्यू जरुर तपासा

तुम्हाला एखादे हॉटेल बुक करायचे असेल तर त्या हॉटेलचे रिव्ह्यू जरूर वाचावेत. तसेच इतर लोकांनी या हॉटेलला किती रिव्ह्यू दिलेले आहेत, हेदेखील जरूर पाहा. काही लोक रिव्ह्यू करताना हॉटेलचे फोटो टाकतात. हे फोटोदेखील एकदा पाहून घ्यावेत. हॉटेल सर्व्हिसशी संबंधित नियमदेखील जरूर पाहावेत.

सोबतच कोणतेही हॉटेल बुक करताना त्या हॉटेलची तुलना इतर हॉटेल्ससी करा. मिळणाऱ्या सुविधा, सुविधांच्या बदल्यात किती रुपये घेतले जातात? याची तुलना करूनच हॉटेल बुक करावे.