हॉटेल बुक करण्यापूर्वी, या गोष्टी नक्की तपासा, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो.
हॉटेल बुक करण्यापूर्वी काही गोष्टींची तपासणी करणे फार आवश्यक आहे. अन्यता तुमची सुरक्षा धोक्यात येऊन अडचणी वाढू शकतात. तसेच पैसेही वाया जाऊ शकतात. त्यासाठी काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे.

आपण जेव्हा जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला हॉटेलमध्ये राहावे लागते. किंवा कोणत्याही पिकनीकसाठी हॉटेल बुक करावी लागते. पण हॉटोल बूक करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे किंवा काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. तसेच काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे देखील अत्यंत आवश्यक असते.अन्यथा तुमचा मूड खराब होऊ शकतो तसेच. तुमच्या सुरक्षेचा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे जाणून घेऊयात की हॉटेल बुक करताना लक्षात ठेवण्यासारख्या या गोष्टी
हॉटेल बुक करण्यापूर्वी काय तपासावे?
स्थान : हॉटेलचे स्थान तुमच्या पिकनीक स्पॉट किंवा जिथे तुम्हाला जायचे आहे तिथे असणे अतिशय महत्वाचे आहे. जर ते मुख्य बाजारपेठ, पर्यटन स्थळ किंवा वाहतूक सुविधेजवळ असेल तर वेळ आणि पैसा वाचतो. शिवाय दगदग कमी होते. तसेच निर्जन किंवा असुरक्षित ठिकाणे टाळा.
वैशिष्ट्ये एक्सप्लोर करा : हॉटेलमध्ये वाय-फाय, गरम पाणी, रूम सर्व्हिस, पार्किंग, लिफ्ट आणि हाऊसकीपिंग सारख्या सुविधा आहेत का? तसेच मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी लिफ्ट, रॅम्प किंवा किड्स झोनसारख्या विशेष सुविधा आहेत का ते शोधा.
रिव्ह्यू आणि रेटिंग वाचा
Google, TripAdvisor किंवा Booking.com वर हॉटेल रिव्ह्यू वाचा. जर हॉटेलचे बहुतेक रिव्ह्यू नकारात्मक असतील तर बुकिंग टाळा.
सुरक्षिततेची काळजी घ्या : हॉटेलमध्ये सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षित लॉक सिस्टम असावी. खोलीत लपलेले कॅमेरे आहेत का ते तपासण्यासाठी मोबाईल कॅमेरा किंवा टॉर्च वापरा. विशेषतः महिला आणि एकट्या प्रवाशांसाठी महत्वाचे आहे.
तुमचे पैसे परत मिळतील का? : जर ट्रिप रद्द झाली तर तुमचे पैसे परत मिळतील की नाही हे आधीच जाणून घ्या. फ्लेक्सिबल बुकिंग पर्याय निवडा जेणेकरून तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही.
चेक-इन आणि चेक-आउट वेळा : बहुतेक हॉटेल्समध्ये चेक-इन दुपारी 12 किंवा 2 वाजता सुरू होते.पण लवकर चेक-इन किंवा उशिरा चेक-आउटची सुविधा आहे का ते आधीच विचारून ठेवा.
बुकिंग कन्फर्मेशन आणि ID सोबत ठेवा : तुमचे बुकिंग कन्फर्मेशन आणि आयडी सोबत ठेवा. हॉटेलमध्ये चेक-इन करताना बुकिंग कन्फर्मेशन आणि ओळखपत्र जसं की आधार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवा.
वाय-फाय सुरक्षितपणे वापरा
हॉटेल वाय-फाय वरून बँकिंग किंवा वैयक्तिक डेटा शेअर करणे टाळा. सार्वजनिक नेटवर्कवर VPN वापरा.
