‘सन टॅन’ दूर करण्यासाठी हे प्रभावी घरगुती उपाय वापरून पहा.. जाणून घ्या, किचनमधील कोणते पदार्थ तुमची काळवंडलेली त्वचा करेल पूर्वीसारखी!

कडक उन्हात टॅनिंग ही एक सामान्य समस्या आहे. सूर्याच्या थेट किरणांच्या संपर्कात आल्याने आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेची चमक कमी होते. अशा परिस्थितीत, आपल्या त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे

‘सन टॅन’ दूर करण्यासाठी हे प्रभावी घरगुती उपाय वापरून पहा.. जाणून घ्या, किचनमधील कोणते पदार्थ तुमची काळवंडलेली त्वचा करेल पूर्वीसारखी!
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 11:44 PM

मुंबईः त्वचेसाठी इतर दोन ऋतुंच्या तुलनेत उन्हाळा जास्त त्रासदायक (More annoying) असतो. सूर्याच्या तीव्र किरणांचा शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. उष्णतेचा थेट परिणाम त्वचेवर होतो, त्यामुळे त्वचेची चमक कमी होऊन काळी पडते, याला सन टॅन म्हणतात. सन टॅन (Sun tan) ही महिलांसाठी एक प्रमुख चिंतेची समस्या होऊन बसते. कारण स्रीयांची त्वचा पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील असते. बाजारात अशी अनेक ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत ज्याचा वापर सन टॅन्ड स्किन काढण्यासाठी केला जातो. पण त्यांचा प्रभाव त्वचेवर फार काळ राहत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक घरगुती उपाय (Home Remedies) करून पाहू शकता. हे घरगुती उपाय सन टॅन दूर करण्यात मदत करतील. घरगुती उपायांमध्ये आपण किचनमधीलच काही गोष्टींचा वापर त्वचेवर करून, आपली त्वचा पूर्वीसारखी बनवू शकता.

टोमॅटो

टोमॅटो केवळ जेवणाची चव वाढवण्याचे काम करत नाही तर ते त्वचेसाठी अनेक प्रकारे केले जाऊ शकते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते सूर्यप्रकाश आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यात लाइकोपीन असते. हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते. त्वचेवर लावण्यासाठी टोमॅटो मॅश करून, त्याचा रस काढा. आता हा रस संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून 2 वेळा हा प्रयोग करू शकता. हे टॅनिंग काढून टाकण्यास आणि त्वचेवर चमक आणण्यास मदत करते.

डाळीचे पीठ

हरबऱयाच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसन तुमच्या त्वचेसाठी उत्तम काम करते. हे सन टॅन दूर करण्यास मदत करते. बेसन त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते. यामुळे त्वचा उजळते. त्यामुळे त्वचा चमकदार होते. बेसनाचा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 3 चमचे बेसन, 1 टीस्पून ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस घालून, त्यात चिमूटभर हळद घाला. हे सर्व घटक एकत्र मिसळून, त्वचेवर लावा. ते कोरडे होईपर्यंत त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा कोमट पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता. त्वचेवरील टॅन काढण्यासाठी हा फेस पॅक खूप प्रभावी आहे.

दही आणि मध

दही आणि मध कोणत्याही घरात सहज उपलब्ध असतात. दही हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. दह्यामध्ये असलेले नैसर्गिक ऍसिड आणि एन्झाईम्स तुमची त्वचा एक्सफोलिएट आणि थंड ठेवण्यास मदत करतात. मधामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे हानिकारक UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्याचे काम करते. यासाठी २ टेबलस्पून दह्यात १ टेबलस्पून मध मिसळून, ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा कोमटाने धुवा.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.