संत्र्याचे रिफ्रेश टेस्ट आणि क्रिमी टेक्सचर असलेल ‘हे’ डेझर्ट इफ्तारसाठी करा ट्राय, जाणून घ्या सोपी झटपट रेसिपी

रमजानमध्ये इफ्तारसाठी विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ तयार केले जातात, ज्यामध्ये नेहमीच काहीतरी गोड असते. तर आजच्या लेखात आपण 10मिनिटांत संत्र्यापासून बनवता येणारं डेजर्टची रेसिपी जाणून घेऊयात.

संत्र्याचे रिफ्रेश टेस्ट आणि क्रिमी टेक्सचर असलेल हे डेझर्ट इफ्तारसाठी करा ट्राय, जाणून घ्या सोपी झटपट रेसिपी
iftar orange dessert
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 18, 2026 | 7:50 PM

रमजानच्या पवित्र महिना सुरू झालेला आहे. विशेषतः इफ्तार दरम्यान अनेक मुस्लिम बांधव त्यांच्या घरी इफ्तार पार्टी आयोजित करतात, ज्यासाठी विविध पारंपारिक पदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये मसालेदार आणि चटपटीत पदार्थ तसेच डेजर्ट असे असंख्य पदार्थ बनवतात. पण काहीजण हे डेजर्ट बनवायला कंटाळा करतात कारण की डेजर्ट बनवणे म्हणजे खूप वेळाखाऊ प्रकार आहे असे काहींना वाटते. त्यामुळे अनेकजण हे बाजारातून खरेदी करतात. मात्र आजच्या लेखात आपण एका अनोख्या आणि खुप कमी वेळेत तयार होणारी स्वादिष्ट डेजर्टची रेसिपी जाणून घेऊयात.

या लेखात आपण ज्या डेजर्ट बद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव “ऑरेंज पॉसेट” आहे. त्याच्या नावाप्रमाणेच त्याची चवही तितकीच छान आहे. संत्र्यांचा एक फ्रेश करणारी चव, तसेच त्याचा क्रिमी टेक्सचर पाहून तुम्हाला खाण्याचा मोह आवरणार नाही. तर स्टेप बाय स्टेप रेसिपी जाणून घेऊयात.

ऑरेंज पॉसेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

या डेजर्टसाठी तुम्हाला 250 मिली फ्रेश क्रीम, ⅓ कप पिठीसाखर, एका संत्र्याचे साल, ¼ कप ताज्या संत्र्याचा रस आणि 1 टेबलस्पून लिंबाचा रस लागेल.

ऑरेंज पॉसेट बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम, संत्र्याचे मधून दोन समान भाग करा आणि नंतर चमच्याच्या मदतीने त्याच्या आतील संत्र्याचा गर काढा जेणेकरून संत्र्याची साल वाटीच्या आकारात तशीच राहील.

एका पॅनमध्ये पिठीसाखर टाका आणि नंतर त्यात किसलेले संत्र्याचे साल मिक्स करून हाताने चांगले एकजीव करा.

त्यानंतर या पिठीसाखरमध्ये फ्रेश क्रीम टाक आणि 3-4 थेंब व्हॅनिला एसेन्स देखील टाकून सर्व मिश्रण नीट फेटून घ्या.

आता पॅन मध्यम आचेवर ठेवा आणि हे मिश्रण सतत ढवळत राहा. आता क्रीमचे मिश्रण मंद आचेवर उकळू द्या.

एकदा ते उकळले की, गुळगुळीत टेक्सचर येण्यासाठी हे मिश्रण आणखी 2-3 मिनिटे उकळू द्या. यामुळे सुगंध चांगल्या प्रकारे शोषला जातो.

आता हे मिश्रण थोडे थंड होण्यासाठी 1-2 मिनिटे तसेच राहू द्या.

आता तुम्हाला त्यात संत्र्याचा रस आणि लिंबाचा रस मिक्स करावा लागेल आणि ते चांगले मिक्स होई पर्यंत हळूहळू ढवळत रहा.

जेव्हा सर्व घटक मिक्स होतील तेव्हा तुम्हाला क्रिमी टेक्सचर मिळते, आता हे मिश्रण एका गाळणीच्या मदतीने भांड्यात गाळून घ्या.

तुम्ही ते थेट बाउलमध्ये सेट करू शकता किंवा संत्र्याच्या सालीत सेट होण्यासाठी ठेवू शकता, ज्यामुळे खाताना त्याची चव आणखी चांगली लागते.

हे मिष्टान्न कमीत कमी 6 तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.

तसेच ऑरेंज पॉसेट तुम्ही दिवसा बनवू शकता आणि इफ्तारसाठी खाऊ शकता.

टिप्स

सजावटीसाठी तुम्ही संत्र्याचे छोटे तुकडे आणि पुदिन्याची पाने, थोडे चांदीचे फॉइल आणि हलके बारीक चिरलेले पिस्ते व काजू यात मिक्स करू शकता.

तसेच हे डेजर्ट बनवत असताना ताजे लिंबाचा रस वापरणे.

जेव्हा क्रीम गरम किंवा उकळत असेल तेव्हा त्यात लिंबू किंवा संत्र्याचा रस मिक्स करू नका, कारण यामुळे क्रीम खराब होऊ शकते, म्हणून क्रिम थंड झाल्यावर लिंबाचा व संत्र्याचा रस मिक्स करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)