रोज हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे!

| Updated on: Jun 04, 2023 | 4:36 PM

त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे सांगणार आहोत. चेहऱ्यावर हळदीचे पाणी वापरल्याने पिंपल्स, काळे डाग, त्वचेची ॲलर्जी आणि टॅनिंग दूर होते. त्याचबरोबर यामुळे तुमचा रंग सुधारतो आणि त्वचा चमकदार होते, तर चला जाणून घेऊया हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे.

रोज हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे!
turmeric water
Follow us on

मुंबई: उन्हाळ्याचा हंगाम येताच तुमची त्वचा चिकट आणि काळी पडू लागते. यामुळे पिंपल्स, मुरुम, टॅनिंग अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मग या समस्या टाळण्यासाठी तुम्ही विविध प्रकारची ब्युटी प्रॉडक्ट्स वापरता, पण त्यात केमिकल्स भरपूर प्रमाणात असतात, जे तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशावेळी त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे सांगणार आहोत. चेहऱ्यावर हळदीचे पाणी वापरल्याने पिंपल्स, काळे डाग, त्वचेची ॲलर्जी आणि टॅनिंग दूर होते. त्याचबरोबर यामुळे तुमचा रंग सुधारतो आणि त्वचा चमकदार होते, तर चला जाणून घेऊया हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे.

हळदीचे पाणी कसे बनवायचे?

  • हळदीचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कढई घ्यावी.
  • नंतर त्यात 1 ग्लास पाणी आणि 1 चमचा हळद घाला.
  • यानंतर तुम्ही ते चांगले उकळून पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • यानंतर तुम्ही ते चेहऱ्यावर लावून चांगले धुवून घ्या.

हळदीच्या पाण्याचे त्वचेसाठी फायदे

  • रोज झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते.
  • प्राचीन काळापासून वधूच्या लग्नाच्या वेळी हळदीचा समावेश केला जातो. चेहऱ्यावर हळदीच्या पाण्याचा वापर केल्यास डाग दूर होतात. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्याचा रंगही सुधारतो
  • हळदीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे रोज हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुमांची समस्या दूर होण्यास सुरुवात होते.
  • हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, त्यामुळे जर तुम्ही त्वचेसाठी हळदीच्या पाण्याचा वापर केला तर तुम्हाला चेहऱ्यावरील चिडचिड आणि खाजेपासून सुटका मिळते.

हळदीचे पाणी कसे वापरावे?

  • रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याने चेहरा धुवा.
  • याच्या नियमित वापराने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे दिसतील.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)