501 वर्षांनंतर सफला एकादशीला मोठा योगायोग, या दिवशी अवश्य करा ‘हे’ विशेष उपाय
यावर्षी सफला एकादशी खूप खास मानली जात आहे. कारण या दिवशी एक मोठा योगायोग घडणार आहे. त्यामुळे या दिवशी हे विशेष उपाय अवश्य करा.

वर्षभरात 24 एकादशीचे व्रत असतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशीचे व्रत पाळले जाते. एक एकादशी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते. आपल्या हिंदू धर्मात एकादशीचे व्रत खूप पवित्र मानले जाते. हे व्रत विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तर या महिन्यात येणाऱ्या सफला एकादशीचे व्रत पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात पाळले जाणार आहे. या दिवशी उपवासासोबतच भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक केली जाते.
सफला एकादशीला तुम्ही मनोभावे भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने तुमच्या सर्व प्रयत्नांना यश मिळते, जीवनात समृद्धी येते आणि घर सुरक्षित राहते. या वर्षी सफला एकादशी खूप खास मानली जाणार आहे. तर ही एकादशी 15 डिसेंबर, सोमवार रोजी येते. या दिवशी एक महत्त्वाचा योगायोग घडणार आहे. म्हणून तुम्ही या एकादशीच्या दिवशी हे विशेष उपाय अवश्य करा. जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व कष्ट, दारिद्रय दुर होईल. चला तर मग या एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावे ते जाणून घेऊयात.
सफला एकादशी 2025 तारीख आणि शुभ वेळ
हिंदू कॅलेंडरनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 14 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजून 46 मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी 15 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजून 09 मिनिटांनी संपेल. म्हणून कॅलेंडरनुसार यावर्षी 15 डिसेंबर रोजी सफला एकादशी व्रत पाळले जाईल.
सफला एकादशीला करा हे उपाय
सफला एकादशीच्या दिवशी एक लाल कापड घ्या. त्यावर चिमूटभर हळद शिंपडा. नंतर त्या कापडावर दोन लवंगा आणि एक रुपयाचे नाणे ठेऊन या वस्तू बाहेर येणार नाही यांची काळजी घेऊन एक गाठ बांधा आणि हे लाला कापड भगवान शंकराच्या मंदिरात ठेवा. हा विधी केल्यानंतर 24 तासांच्या आत चमत्कार घडेल असे मानले जाते. असे मानले जाते की या उपायाचे पालन केल्याने तुमच्या घरातील रोख रक्कम कधीही रिकामी होणार नाही.
सफला एकादशीचे महत्त्व
सफला एकादशीला भगवान विष्णूचे पुजा आणि उपवास केल्याने तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात. सफला एकादशीला उपवास केल्याने हजारो वर्षांच्या तपस्येइतके फळ मिळते. त्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते. भगवान विष्णूंचे आशीर्वाद सदैव राहतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
