
आपल्या घरात अनेक जुनी आणि निरुपयोगी भांडी असतात, जी आपण सहसा फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की याच जुन्या भांड्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या घराला एक नवा आणि आकर्षक लुक देऊ शकता? क्रिएटिव्ह पद्धतीने या भांड्यांचा वापर केल्यास तुम्ही तुमच्या घराला एक ‘युनिक’ आणि सुंदर रूप देऊ शकता. चला, जुन्या भांड्यांपासून आकर्षक ‘DIY क्राफ्ट्स’ कसे बनवायचे, यासाठी काही सोप्या आणि मजेदार आयडियाज जाणून घेऊया.
जुन्या भांड्यांपासून बनवा खास क्राफ्ट्स
1. भिंतीवर लावा सजावटीची प्लेट:
जर तुमच्याकडे मोठी, पण जुनी प्लेट असेल, तर तिला फेकून देऊ नका. त्या प्लेटवर सुंदर डिझाइन किंवा चित्र काढून तुम्ही ती तुमच्या घराच्या भिंतीवर लावू शकता. यामुळे तुमची भिंत सुंदर दिसेल आणि तुम्हाला तुमची कला दाखवण्याची संधीही मिळेल.
2. ज्वेलरी बॉक्स :
तुमच्याकडे जुन्या प्लास्टिकच्या वाट्या (कटरिया) असतील, ज्यांवर मसाल्यांचे डाग लागले असतील, तर त्या स्वच्छ करून घ्या. त्यांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवा आणि ज्वेलरी बॉक्स म्हणून वापरा. यामुळे तुमच्या दागिन्यांसाठी एक सुंदर आणि हटके जागा तयार होईल.
3. पेन्सिल होल्डर :
लहान भांडी किंवा जुने ग्लास तुम्ही पेन्सिल, पेन किंवा इतर ऑफिसचे सामान ठेवण्यासाठी वापरू शकता. त्यांना रंग देऊन, तुम्ही तुमच्या स्टडी टेबलला एक सुंदर लुक देऊ शकता.
4. प्लांटर्स :
जुन्या मातीच्या भांड्यांना किंवा स्टीलच्या मोठ्या भांड्यांना रंग देऊन आणि सजवून तुम्ही त्यांना झाडं लावण्यासाठी वापरू शकता. तर भांड्यांना रंग देऊन त्यावर काही खास डिझाइन्स काढा. यात फुले किंवा इतर शोभेची झाडं लावून तुम्ही तुमच्या बाल्कनीची शोभा वाढवू शकता.
5. सजावटीच्या वस्तू :
घरामध्ये मोठी भांडी निरुपयोगी पडली असतील, तर त्यांना पेंट करून किंवा त्यावर कलाकुसर करून तुम्ही त्यांना सजावटीच्या वस्तू बनवू शकता. या वस्तूंना तुम्ही घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवल्यास ती जागा आणखी खास दिसेल.
6. दिव्यांसाठी होल्डर:
घरात छोटे, जुने दिवे असतील, तर त्यांना रंग देऊन तुम्ही ते मेणबत्तीसाठी वापरू शकता.
या सोप्या आणि मजेदार आयडियाज वापरून तुम्ही तुमच्या घरात असलेल्या जुन्या वस्तूंना एक नवा आणि उपयोगी लुक देऊ शकता. यामुळे तुमचा खर्चही वाचेल आणि तुमच्या घराला एक खास कलात्मक स्पर्श मिळेल.