
हिवाळा ऋतू सुरू झाला की बाजारात आपल्या विविध प्रकारच्या ताज्या भाज्या पाहायला मिळतात. या हंगामात फ्लॉवरचा वापर अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. फ्लॉवर ही प्रत्येक घरात आवडते. फ्लॉवरचा वापर केवळ भाजी म्हणून केला जात नाही तर पराठे आणि मंचुरियन असे पदार्थ बनवण्यासाठी होतो आणि आवडीने हे पदार्थ खाल्लेही जातात.
बाजारात दिसणारा हा पांढरा शुभ्र फ्लॉवर हा खरेदी करताना काळजीपूर्वक तपासून सुद्धा त्यामध्ये किडे हे असतातच. कधीकधी, बाहेरून स्वच्छ दिसणाऱ्या फ्लॉवरमध्येही लहान किडे अळ्या असू शकतात. त्यात असलेले किडे फक्त पाण्याने धुऊनही जात नाहीत. तर आजच्या लेखात आपण फ्लॉवर कशी खरेदी करावी आणि ती योग्यरित्या कशी स्वच्छ करावी ते जाणून घेणार आहोत.
नेहमी दुधासारखा पांढरा दिसणारा फ्लॉवर खरेदी करा. जर तुम्हाला फ्लॉवर वर लहान काळे किंवा गडद तपकिरी डाग दिसले तर त्यावर बुरशी किंवा किटकांचा प्रादुर्भाव असू शकतो. तेव्हा अशी फ्लॉवर घेणे टाळा.
फ्लॉवर घट्ट असली की त्यात कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. जर फ्लॉवर विखुरलेली असतील किंवा त्यांच्यामध्ये खूप अंतर असेल तर कीटक सहजपणे आत प्रवेश करू शकतात. त्यामुळे अशी फ्लॉवर खरेदी करणे टाळा.
ताजी आणि किड नसलेली फ्लॉवरची पाने नेहमीच चमकदार हिरवी असतात आणि खोडाला चिकटलेली असतात. जर पाने वाळलेली, पिवळी दिसली किंवा त्यांना छिद्रे दिसली तर कीटकांचा फ्लॉवरच्या आत असण्याची शक्यता असते.
फ्लॉवर खरेदी करताना त्याचा खोड तपासा. जर तुम्हाला खोडात छिद्रे दिसली किंवा ती आतून पोकळ दिसत असेल तर त्यावर किडे किंवा कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जवळजवळ निश्चित आहे.
फ्रेश चांगली कोबी हातात जड वाटली पाहिजे आणि कोबीचा आकारही चांगला असला पाहिजे. बऱ्याच दिवसांची फ्लॉवर बहुतेकदा आतून कोरडी असते किंवा कीटकांनी खाल्ली असते. ताज्या फ्लॉवरला विशिष्ट वास नसतो. जर त्याचा वास थोडासाही वेगळा असेल तर फ्लॉवर खरेदी करू नका.
फ्लॉवर घरी आणल्यानंतर कापण्यापूर्वी ते कोमट पाण्यात मीठ किंवा हळद टाकून त्यात 10-15 मिनिटे ठेऊन द्या. यामुळे आत लपलेले कोणतेही लहान कीटक काढून टाकण्यास मदत होईल.
डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.