चेहऱ्यावरील ‘सुरूकुत्या कमी’ करण्यासाठी वापरा टरबूजाच्या बियांचे तेल… सौंदर्य निगा राखण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असलेल्य ‘या’ तेलाचे आहेत अनेक फायदे!

| Updated on: Jun 17, 2022 | 7:33 PM

टरबूज बियांपासून तयार केलेले तेल. होय या तेलापासून तुम्हाला तुमच्या त्वचेच्या अनेक समस्येपासून सुटका मिळू शकते.

चेहऱ्यावरील ‘सुरूकुत्या कमी’ करण्यासाठी वापरा टरबूजाच्या बियांचे तेल... सौंदर्य निगा राखण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असलेल्य ‘या’ तेलाचे आहेत अनेक फायदे!
Follow us on

उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ म्हणजे टरबूज होय. वाढत्या तापमानात याचे सेवन केल्याने, शरिराला या फळामुळे थंडावा मिळतो. यासोबतच या फळाचे इतरही अनेक फायदे आहेत. असाच एक फायदा म्हणजे, टरबूज बियांपासून तयार केलेले तेल. होय या तेलापासून तुम्हाला तुमच्या त्वचेच्या अनेक समस्येपासून सुटका मिळू शकते.
उन्हाळ्याच्या दिवसात सतत बदलणारे हवामान लोकांच्या त्वचेविषयीच्या समस्या दुप्पट (Double the skin problems) करते, परंतु काही लोक असे आहेत जे उन्हाळ्याच्या हंगामाची प्रतीक्षा करतात. कारण या सिजनमध्येच आंबा, टरबूज यांसारखी रसाळ आणि स्वादिष्ट फळे उपलब्ध होतात. टरबूजाचे वैशिष्ट्य म्हणजे ते चवदार असण्यासोबतच उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. सामान्यतः प्रत्येकजण ते खाताना त्याच्या बिया फेकतो, परंतु तुम्हाला माहित आहे का की, टरबूजाप्रमाणेच त्याचे बिया (watermelon seed oil beauty benefits) देखील तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. होय, तुम्ही टरबूजच्या बिया त्वचेच्या किंवा सौंदर्याच्या काळजीमध्ये वापरू शकता. तज्ज्ञांच्या मते, या बियांपासून बनवलेले तेल उन्हाळ्यातील अनेक समस्या दूर करते. विशेषतः या तेलाच्या वापरातून केस आणि त्वचेचे संरक्षण (Hair and skin protection) करता येते.

तेलातून मिळते पोषक तत्वे

टरबुजाच्या बियांच्या तेलातून जीवनसत्त्वे ए, बी, ई, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वे मिळतात. यामध्ये असलेले अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स त्वचेला हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.

सुरुकुत्या कमी करण्यास मदत

त्वचेवर कमी वयातच सुरकुत्या पडणे ही आज एक सामान्य समस्या बनली आहे. तणाव आणि चुकीचा आहार हे याचे कारण असू शकते, परंतु एकदा जर त्वचेवर सुरुकत्या दिसायला लागल्या तर, त्यापासून मुक्त होणे सोपे नसते. टरबूजाच्या बियांपासून बनवलेल्या तेलात अँटिऑक्सिडंट्स असतात. तज्ञांचा असा विश्वास आहे की ते वृद्धत्व विरोधी एजंट म्हणून कार्य करते. Oleic ऍसिड प्रभाव अकाली वृद्धत्व प्रतिबंधित करते.

हे सुद्धा वाचा

पिंपल्सची समस्या दूर करते

चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असणे सामान्य आहे, परंतु जर त्यावर उपचार केले नाहीत तर ते खूप जड जाऊ शकते. त्यांच्यामुळे होणारे डाग सहजासहजी जात नाहीत. चेहऱयावरील मुरूमांचे डाग घालवायचे असतील आणि त्यावर उपचार करायचे असतील तर, आपण रात्री चेहर्यावर टरबूज तेल लावू शकता. रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हातांनी पिंपल्सवर लावा आणि सकाळी चेहरा धुवा. तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल.

केस नवजीवन देण्याचे काम

जर तुम्हाला पातळ आणि निर्जीव केसांना नवजीवन द्यायचे असेल तर तुम्ही यासाठी निश्चीतच टरबूज तेल वापरून पाहू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. थोडे तेल घेऊन टाळू आणि केसांना मसाज करा. आता केसांना शॅम्पू करा आणि त्यानंतर कंडिशनर लावा. टरबूज तेलाचा हा घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करून पाहू शकता.