Valentine’s Week 2023 | रोझ डे ते किस डे… असा साजरा करा ‘व्हॅलेंटाइन’ स्पेशल आठवडा

| Updated on: Feb 06, 2023 | 6:06 PM

व्हॅलेंटाइन डे जरी 14 फेब्रुवारी रोजी असला तरी प्रेमाचं सेलिब्रेशन हे आठवडाभरापूर्वीच सुरू होतं. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे असे पुढील सात दिवस हे सेलिब्रिशेन सुरू असणार आहे.

Valentines Week 2023 | रोझ डे ते किस डे... असा साजरा करा व्हॅलेंटाइन स्पेशल आठवडा
Valentine Week
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई: फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. कारण याच महिन्याच्या 14 तारखेला जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. आपल्या जोडीदारासोबत खास डेटवर जाऊन, एखाद्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त करून किंवा ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्याच्यासाठी काहीतरी खास गोष्ट करून असंख्य कपल्स हा दिवस साजरा करतात. व्हॅलेंटाइन डे जरी 14 फेब्रुवारी रोजी असला तरी प्रेमाचं सेलिब्रेशन हे आठवडाभरापूर्वीच सुरू होतं. उद्यापासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात होणार आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे असे पुढील सात दिवस हे सेलिब्रिशेन सुरू असणार आहे.

7 फेब्रुवारी- रोझ डे

7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात होणार आहे. हा दिवस रोझ डे म्हणून साजरा केला जाणार आहे. यादिवशी आपल्या जोडीदाराला, आवडत्या व्यक्तीला किंवा गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडला गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त केलं जातं.

8 फेब्रुवारी- प्रपोज डे

रोझ डेच्या दुसऱ्याच दिवशी प्रपोज डे साजरा केला जाणार आहे. आपल्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्याचा हा खास दिवस असेल. एखाद्या व्यक्तीसमोर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर हा उत्तम दिवस आहे.

हे सुद्धा वाचा

9 फेब्रुवारी- चॉकलेट डे

व्हॅलेंटाइन वीकमधील हा तिसरा दिवस आहे. यादिवशी एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त केलं जातं. चॉकलेटच्या गोडव्याने नात्यांमधील कटुता आणि वाद दूर करण्याचा त्यामागचा हेतू असतो.

10 फेब्रुवारी- टेडी डे

यादिवशी एखादा टेडी किंवा सॉफ्ट टॉय भेट देऊन तुम्ही तुमच्या पार्टनरला खुश करू शकता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मिळालेली ही छोटीशी भेट त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते.

11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे

व्हॅलेंटाइन वीकच्या पाचव्या दिवशी एकमेकांना ‘प्रॉमिस’ देत हा दिवस साजरा केला जातो. मग हा प्रॉमिस एकमेकांची कायम साथ देण्याचा असो किंवा सुखदु:खाच्या काळात एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याचा.. तुमच्याकडून दिलं जाणारं छोटंसं आश्वासन जोडीदारासाठी अत्यंत आनंदाचा क्षण ठरू शकतो.

12 फेब्रुवारी- हग डे

परिस्थिती कोणतीही असो तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कायम असाल आणि कोणत्याही प्रकारचा भावनिक दुरावा कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल.. याचं आश्वासन ‘हग डे’ देतो.

13 फेब्रुवारी- किस डे

व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी ‘किस डे’ साजरा केला जातो. जोडीदारावर प्रेम करण्यासाठीचा हा खूप सुंदर दिवस आहे.

14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाइन डे

14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. जोडीदारासोबत डेटवर जाऊन, भेटवस्तूंची देवाणघेवाण करून, एकत्र चांगला वेळ घालवून किंवा सरप्राइज देऊन हा दिवस साजरा केला जातो.