Vastu Tips | वास्तुशास्त्रातील पोळपाट-लाटण्यासंबधीचे नियम माहीत आहेत का? आत्ताच काळजी घ्या

वास्तुशास्त्राच्या नियमांमध्ये स्वयंपाक घरातील काही चुका तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान करु शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेली लाटणे ठेवल्याने खूप मोठे नुकसान होऊ शकते.

Vastu Tips | वास्तुशास्त्रातील पोळपाट-लाटण्यासंबधीचे नियम माहीत आहेत का? आत्ताच काळजी घ्या
vastu tips for kitchen

मुंबई : वास्तुशास्त्राच्या नियमांमध्ये स्वयंपाक घरातील काही चुका तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान करु शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेली लाटणे ठेवल्याने खूप मोठे नुकसान होऊ शकते.

तुटलेले लाटणे म्हणजे दारिद्रचे लक्षण

वास्तुशास्त्रात तुटलेली प्रत्येक गोष्ट अशुभ मानली जाते. त्याच प्रमाणे तुटलेले लाटणे म्हणजे दारिद्रचे लक्षण मानले जाते. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

पोळपाट-लाटणे विकत घेण्याचा काळ

वास्तुनुसार पोळपाट-लाटणे अतिशय शुभ मानले जाते. पण वास्तुशास्त्रात पोळपाट-लाटणे खरेदी करण्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आला आहे. बुधवारी पोळपाट-लाटणे खरेदी करणे अत्यंत खूप शुभ मानले जाते. या दिवशी पोळपाट-लाटण्याची खरेदी केल्यास तुम्हाला अर्थिक फायदा होतो. तर मंगळवार आणि शनिवारी पोळपाट-लाटणे खरेदी केल्यास. जिवनात अनेक समस्या निर्माण होतात.

कुठे ठेवाल पोळपाट-लाटणे

पोळपाट-लाटणे वापरल्यानंतर धुतले पाहिजे. ते गलिच्छ ठेवल्याने वास्तूदोष होतो आणि घरात रोग आणि आर्थिक समस्या वाढतात. बहूतेक वेळा आपण पोळपाट-लाटणे न धुताच तसेच ठेवतो पण ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. चपाती लाटताना आवाज येईल असे पोळपाट-लाटणे कधीही चांगले नसते. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये भांडणे, मतभेद आणि समस्या निर्माण होतात.

कोणत्या प्रकारचे पोळपाट-लाटणे चांगले असते ?

वास्तूशास्त्रात कोणत्या प्रकारचे पोळपाट-लाटणे वापरणे चांगले असते या बद्दल माहिती दिली आहे. वास्तूशास्त्रानुसार स्टीलचे पोळपाट-लाटणे सर्वात चांगले असते. लाकडाच्या पोळपाट-लाटण्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात होतो.

ही आजच सवय बदला

जर, तुम्हीही घरात पोळपाट-लाटणे उलटे ठेवत असाल तर आजपासून ही सवय बदला. हे अशुभ मानले जाते. तसेच, पोळपाट-लाटणे पीठाच्या आणि तांदळाच्या डब्ब्यावर ठेवू नये. यामुळे घरात समृद्धी येते.

 

इतर बातम्या : 

vastu tips | घरात आर्टिफिशियल फुलं ठेवताय ? थोडं जपून होऊ शकतं मोठं नुकसान

Ashoka Tree : ‘या’ झाडाची साल आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल अधिक!

Health Care : झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टी कधीही खाऊ नका अन्यथा आरोग्याला मोठे नुकसान होईल! 

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI