vastu tips | घरात आर्टिफिशियल फुलं ठेवताय ? थोडं जपून होऊ शकतं मोठं नुकसान

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्ट कुठे ठेवायची याचे काही नियम आहेत. तुम्ही घरात आर्टिफिशियल फुलं ठेवत असालं तर वास्तू शास्रानुसार ती फुले कुठे ठेवावीत याचे काही नियम आहेत. जस तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्हाल खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल.

vastu tips | घरात आर्टिफिशियल फुलं ठेवताय ? थोडं जपून होऊ शकतं मोठं नुकसान
flawers

मुंबई : वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्ट कुठे ठेवायची याचे काही नियम आहेत. तुम्ही घरात आर्टिफिशियल फुलं ठेवत असालं तर वास्तू शास्रानुसार ती फुले कुठे ठेवावीत याचे काही नियम आहेत. जस तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्हाल खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल. जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर घरातील नाकारात्म उर्जा देखील निघून जाईल. वास्तूच्या अशाच काही नियमांनुसार घरात झाडे लावण्याचाही एक खास नियम आहे. माणूस निर्सगामध्ये जास्त रमतो त्यामुळेच सर्व जण घरात हिरळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण हा प्रयत्न यशस्वी न झाल्यास काही लोक घरामध्ये कृत्रिम वनस्पतीची लागवड करातात. वास्तूशास्त्रात या कृत्रिम वनस्पतींसाठी काही नियम देखील आहेत.

कृत्रिम वनस्पती रोपं स्वच्छ ठेवा

बऱ्याचदा लोक घरात शोभेच्या वनस्पती आणि फुले ठेवतात पण त्यांच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष देत नाहीत. असे केल्याने घरात नकारात्मकता येते आणि नकळत घरात अशांतता निर्माण होते. जर तुम्ही घर सजवण्यासाठी घरात रंगीबेरंगी रोपे लावलीत, तर लक्षात ठेवा की ते वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजेत. अशी फुलांमध्ये धुळ जमा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहीजे.

पायऱ्यांवर वनस्पती लावू नका

घरात सर्वाधिक वापरले जाणारे ठिकाण एक घराच्या पायऱ्या. लोक सजावटीच्या वनस्पती आणि फुले त्याच्या सुशोभित कोपऱ्यात ठेवतात. जर तुम्ही घराच्या पायऱ्या सजवण्यासाठी कृत्रिम वनस्पती वापरत असाल तर तुम्ही हे करू नये. वास्तु नुसार, पायर्यांमधील अशी झाडे आणि झाडे केवळ नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात.

कोणत्या दिशेला ठेवाल ही फुलं?

जर तुम्ही घरामध्ये कृत्रिम फुले ठेवणार असालं तर आशा रोपांची दिशा देखील महत्वाची असते. जर ही रोपे चुकीच्या दिशेला ठेवली तर वास्तू दोष निर्माण होतात. अशा फुलांची सजावट तुम्ही घराच्या पश्चिम आणि पूर्वे या दिशेली लावू शकता.

अशा प्रकारची झाडे टाळा

वास्तूशास्त्राप्रमाणे घरामध्ये नैसर्गिक असोत किंवा कृत्रिम काटेरी वृक्ष लावणे टाळा अशा प्रकारची वृक्ष घरात नकारात्मकता आणतात.वास्तूच्या नियमांनुसार, घरात कृत्रिम वनस्पतीं किंवा फुलांपेक्षा खरी वनस्पतीं किंवा फुलां केव्हाही चांगले. अशा वनस्पती घरामध्ये सकारात्मकता आणतात.

(काही बदल करण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

इतर बातम्या:

कार्तिक महिना 2021: कार्तिक महिना कधी सुरु होतो? या काळात तुळशीची पूजा, तिचे महत्व, जाणून घ्या सविस्तर माहिती

एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो… अहो वाचून तर बघा

Kojagiri purnima 2021 | कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध पिण्याचं शास्त्रीय कारण माहितीय?

 

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI