पोटाची चरबी कमी करायचीय? मग ‘या’ टिप्स फाॅलो करा, बघा रिझल्ट!

| Updated on: Mar 14, 2021 | 9:37 AM

लठ्ठपणा नको आणि निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही काय खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे.

पोटाची चरबी कमी करायचीय? मग या टिप्स फाॅलो करा, बघा रिझल्ट!
Follow us on

मुंबई : लठ्ठपणा नको आणि निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही काय खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे. कारण एकदा आपले वजन वाढल्यानंतर, पुन्हा ते कमी करताना खूप त्रास सहन करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहारात बदल करावा लागतो. सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण पौष्टिक अन्नापेक्षा फास्ट फूड आणि पॅक केलेल्या अन्नाचा जास्त वापर करतो. याचा परिणाम फक्त आपल्या आरोग्यावरच नाहीतर आपल्या वजनावर देखील पडतो. (Want to lose belly fat Then follow these tips)

फास्ट फूड खाल्ल्याने चरबी जमा होते. त्यामध्येही अनेकांची अशी समस्या आहे की, पोटाच्या भागामध्ये चरबी होते आणि ही चरबी कमी करणे सोपे काम नाही, परंतु आपण जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवून वाढविलेले वजन कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही वजन नियंत्रणात आणू शकता.

-ओट्स हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लूकेन्सदेखील आहेत. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समधून 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. साधारण 150 रुपये किलो असणारे ओट्स बाजारात सहज उपलब्ध होतात आणि ओट्स खाल्लाने तुमचे वजनही कमी होते.

-उन्हाळ्याच्या हंगामात काकडी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज काकडी खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही. काकडीमध्ये 80 टक्के पेक्षा जास्त पाणी असते जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

-पोटाची चरबी कमी करण्यासाठी पालक खाणे खूप चांगले आहे. पालकांमध्ये फायबर व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात असते आणि त्यात भरपूर फायबर असतात. यामुळे पोटाची चरबी कमी करण्यासाठी आजच आपल्या आहारात पालकाचा समावेश करा.

-पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक सुद्धा मुबलक प्रमाणात असतं. पनीर खाणं सर्वांसाठी आरोग्यदायी असतं. तसेच ज्या लोकांच्या शरीरात युरिक ऑसिडचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यांना प्रोटीनयुक्त पनीर न खाण्याचा सल्ला दिला जातो. जे नियमित व्यायाम करतात त्यांनी मात्र पनीर खाणं गरजेचं असतं. अनेकांना वाटत की, पनीर खाल्याने वजन वाढते. मात्र, असे नसून पनीर खाल्याने वजन कमी होते.

संबंधित बातम्या : 

फॅट टू फिट… मुंबईतील 132 किलो ‘वजनदार’ महिला कॉन्स्टेबलचा प्रवास

सानियाचा फिटनेस फंडा, केवळ 5 महिन्यात तब्बल 22 किलो वजन घटवलं

(Want to lose belly fat Then follow these tips)