Fitness Band: फिटनेस ट्रॅकरमुळे लोकांना व्यायाम करण्यास मिळते प्रोत्साहन , वजनही होते कमी, अभ्यासातून निष्कर्ष

| Updated on: Jul 23, 2022 | 7:05 PM

फिटनेस ट्रॅकर, पेडोमीटर आणि स्मार्ट वॉच यांसारख्या ॲक्टिव्हिटी ट्रॅकर्समुळे अधिक व्यायाम करणे आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियन संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Fitness Band: फिटनेस ट्रॅकरमुळे लोकांना व्यायाम करण्यास मिळते प्रोत्साहन , वजनही होते कमी, अभ्यासातून निष्कर्ष
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

पेडोमीटर, स्मार्ट वॉच आणि फिटनेस ट्रॅकर सारख्या ॲक्टिव्हिटी ट्रॅकर्समुळे (Wearable activity trackers – WAT) अधिक व्यायाम करणे ( exercise more)आणि वजन कमी करण्यास ( lose weight) प्रोत्साहन मिळते, असे जगभरातील लाखो लोकांचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियन संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासातून हा निष्कर्ण काढण्यात आला आहे. लॅन्सेट डिजीटल हेल्थ मध्ये हा निष्कर्ष छापून आला आहे. या सहज घालत्या येणाऱ्या ॲक्टिव्हिटी ट्रॅकर्समुळे, युझर्सना रोज 40 मिनिटे अधिक ( अंदाजे 1800 पावलं अधिक) चालण्यास प्रोत्साहन मिळते. परिणामी त्यांचे वजन ( साधारणत: ) 1 किलोने कमी होते. असे या निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी, ॲक्टिव्हिटी ट्रॅकर्स वापरणाऱ्या जगभरातील 1,64,000 लोकांचा समावेश असलेल्या 400 हून अधिक केसेसचा अभ्यास केला. दिवसभरात त्यांची शारीरिक हालचाल किती होते, याचाही त्यात अभ्यास करण्यात आला.

व्यायामाच्या अभावामुळेच आपल्या हदय आणि रक्तवाहिन्यासंबधी रोग, स्ट्रोक, टाइप 2 मधूमेह, कर्करोग आणि मानसिक आजारांचाही धोका वाढतो, असे संशोधनाचे निष्कर्ष अधोरेखित करतात. जगभरात महामारी वाढत असतांना, विविध आजारांचा प्रतिकार करण्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमितपणे व्यायाम, वर्कआऊट करण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

मुख्य संशोधक फर्ग्युसन यांच्या सांगण्यानुसार, वेअरेबल ॲक्टिव्हिटी ट्रॅकर्सची लोकप्रियता वाढत आहे. मात्र असे असले तरी त्यांचा खरोखर उपयोग, अचूकता याबद्दल अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. वेअरेबल ॲक्टिव्हिटी ट्रॅकर्स हे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आणि अधिक कार्यकाळासाठी तेवढेच उपयुक्त आहेत, असे आमच्या अभ्यासातून दिसून आले, असे फर्ग्युसन यांनी नमूद केले. नियमितपणे व्यायाम करणे, ( व्यायामाला) त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे आणि वजन कमी करण्यासाठी ध्येय निश्चित करणे यासाठी ॲक्टिव्हिटी ट्रॅकर्सद्वारे लोकांना प्रोत्साहन मिळते, असे दिसून आले. एखादे किलो वजन कमी होणे, ही फारशी मोठी गोष्ट वाटत नसली तरी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वपूर्ण पाऊल आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हा वजन कमी करण्यासंदर्भातील नव्हे तर प्रामुख्याने शारीरिक हालचालींबद्दलचा अभ्यास होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वजन कमी होणे, यावर लक्ष केंद्रित केले नव्हते, असे संशोधकांनी स्पष्ट केले. साधारणत: एखाद्या व्यक्तीचे वजन वर्षभरात अर्धा किलोने वाढते. त्यामुळे 5 महिन्यात 1 किलो वजन कमी होणे, ही तशी महत्वाची गोष्ट ठरते. ऑस्ट्रेलियातील दोन-तृतीयांश जनता ही स्थूल असताना, निघालेला हा निष्कर्ष महत्वपूर्ण ठरतो, असेही त्यांनी नमूद केले. 2014 ते 2018 या काळात जगभरात पाठवण्यात आलेल्या ॲक्टिव्हिटी ट्रॅकर्सच्या संख्येत 1500 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.

त्याशिवाय टाईप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमधील उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास ॲक्टिव्हिटी ट्रॅकर्समुळे मदत होत असल्याचेही समोर आले आहे. तसेच वाढत्या शारीरिक हालचालीमुळे डिप्रेशन आणि ॲँक्झायटीही कमी होते, हाही ॲक्टिव्हिटी ट्रॅकर्समुळे होणारा आणखी एक फायदा आहे, असे फर्ग्युसन यांनी नमूद केले.