कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोन घ्यायचा आहे, तर 2025 मध्ये 15 हजारापेक्षा स्वस्तात लाँच झालेले ‘हे’ 5 धमाकेदार फोन
तुम्हाला जर नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, पण तुमचं बजेट कमी असेल तर चिंता करू नका. कारण 2025 या वर्षात अनेक स्मार्टफोन कंपन्यानी त्यांचे नवीन सेगमेंटमधील फोन 15 हजार रूपयांच्या किमतीत लॉंच केलेले आहे. जे तुम्ही खरेदी करू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनबद्दल जाणून घेऊयात.

बजेट स्मार्टफोनच्या बाजारपेठेत 2025 हे वर्ष खरोखरच उत्तम ठरलं आहे. कारण या वर्षात सामान्य लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक स्मार्टफोन कंपन्यानी 15 हजार रूपयांमध्ये 5G स्मार्टफोन लॉंच केले आहेत. एवढेच नाहीतर यामध्ये असे काही फोन आहेत ज्यात गेमिंगसाठी सक्षम प्रोसेसर देखील मिळत आहे. अशातच तुम्हीही बजेट सेगमेंटमध्ये नवीन फोन शोधत असाल तर 2025 मध्ये 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे Redmi, iQOO, Vivo, Oppo आणि Infinix यासारखे ब्रँडसनी स्मार्टफोन लाँच झाले आहेत. चला तर मग आजच्या लेखात कोणते स्मार्टफोन तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकतात ते जाणून घेऊयात.
Redmi Note 14 SE 5G ची भारतात किंमत: हा Redmi स्मार्टफोन जुलैमध्ये 14,999 रूपयांमध्ये सिंगल 6GB RAM/128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी लाँच करण्यात आला होता. सध्या तो Flipkart वर 13,499 रूपयांमध्ये फोन खरेदी करू शकता.
भारतात Vivo T4x 5G ची किंमत: मार्चमध्ये लाँच झालेला Vivo हा फोन तीन स्टोरेजमध्ये येतो, ज्यात 6GB/128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंटची किंमत 13,999 रूपये आहे. तर यातील 8GB/128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंटची किंमत14,999 रूपये आहे. सध्या 6GB/128GB, तसेच 8GB/128GB आणि 8GB/256GB व्हेरिएंट असलेले स्मार्टफोन 15,499 आणि 16,499 मध्ये उपलब्ध आहेत.
iQOO Z10x 5G ची भारतात किंमत: हा iQOO स्मार्टफोन एप्रिलमध्ये तीन स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला होता. ज्यात सुरुवातीला 6GB/128GB असलेल्या फोनची किंमत 13,499 रूपये आहे. तर 8GB/128GB फोनची किंमत 14,499 रूपये आहे आणि 8GB/256GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 16,499 रूपये आहे. मात्र 6GB/128GB प्रकार सध्या 14,999 रूपये तर 8GB/128GB स्टोरेज फोन किंमत 16,499 रूपये आहे आणि 8GB/256GB स्टोरेज असलेल्या फोन 17,999 मध्ये विकले जात आहे.
भारतात Infinix Note 50x 5G ची किंमत: हा Infinix फोन मार्चमध्ये लाँच करण्यात आला होता, त्याची किंमत 11,499 रूपये आणि 12,999 रूपये आहे. सध्या, 6GB व्हेरिएंट Flipkart वर 12,499 आणि 8GB व्हेरिएंट 13,999 मध्ये विकला जात आहे.
