Weight loss : वजन कमी करायचंय? घरातीलच हे पदार्थ तुम्हाला मदत करतील…

| Updated on: Jan 14, 2022 | 1:27 PM

कामाचे स्वरूप व बदलत्या जीवशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या सामान्य आहे. यासाठी अनेकांकडून आपला ‘डायट प्लॅन’ आखला जात असतो. महागडे उपचार तसेच व्यायाम आदी विविध माध्यमातून वाढत्या वजनाला नियंत्रित केले जाते. परंतु आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारे काही घटक या समस्या सोडविण्यासाठी फायद्याचे ठरु शकतात.

Weight loss : वजन कमी करायचंय? घरातीलच हे पदार्थ तुम्हाला मदत करतील...
वाढत्या वजनाची वेळीच काळजी घ्या
Follow us on

मुंबई : लठ्ठपणाच्या समस्येने आपण सर्वच कमी अधिक प्रमाणात त्रस्त आहोत. खासकरुन तरुणींमध्ये याबाबत फार सजगता असते. वजन कमी करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्यात येतो. जीम, खानपान पध्दती, डायट चार्ट आदींवर विशेष भर देण्यात येत असतो. यासाठी वेळप्रसंगी अतिरिक्त शुल्क देउन व्यावसायिकांकडे जाउन वजन घटवण्यासाठी उपचार घेतले जात असतात. वजन घटवण्याचा विषय निघाल्यावर सर्वात आधी आपणास नजरेस पडते ते दिवसभरात आपण घेत असलेला आहार व त्यातून शरीराला मिळत असलेल्या कॅलरीज्‌. (Calories) साधारणत: कॅलरीज्‌ आणि वजन (weight) या दोन्ही बाबी एकमेकांसाठी व्यस्त प्रमाणात अशा आहेत.

तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज्‌ घेतात यावर तुमचे वजन ठरत असते. तुम्ही दिवसभरात गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेत असाल तर, यातून तुम्हाला लठ्ठपणाची समस्या जाणवू शकते. दुसरीकडे तुम्ही शरीराला आवश्‍यक त्या प्रमाणात त्या घेतल्यास ते तुम्हाला वजन घटवण्यासाठी लाभदायक ठरु शकते. कमी कॅलरी असेले घटक तुमची पचनक्रीया (digestion) सुधारण्यासही मदत करतात. अनेक वेळा वैद्यकीय कारणास्तव आपणास तज्ज्ञांकडून कमी कॅलरीज्‌ असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचाही सल्ला दिला जातो.

शरीरावर असे होतात परिणाम

कमी कॅलरी असलेले अन्नघटक शरीरावर अनेक चमत्कारिक बदल घडवून आणू शकतात. कमी कॅलरीज असलेले अन्नघटक हे पचायला हलके असतात. वय व शारीरिक क्रियाकलाप यावरदेखील मानवी शरीराची चयपचय क्रिया अवलंबून असते. आपला रोजचा आहार घेताना चांगल्या गुणवत्तेची कॅलरी असलेले अन्नघटकांचा समावेश केल्यास यातून शरीरावर चांगले परिणाम दिसू शकतात. कमी कॅलरीज्‌ असलेले अन्नघटक हे पचायला सोपे असतात. या शिवाय ते आपल्या दिवसभरातील उर्जेचे चांगले स्त्रोत असू शकतात. त्यामुळे कमी कॅलरीज्‌ असलेले अन्नघटक हे आपल्या शरीरातील पचनक्रीया मजबूत करण्याचे काम उत्तम प्रकारे करु शकतात.

पालक

पालेभाज्यांमध्ये पालक ही भाजी सहज उपलब्ध होणारी आहे. 100 ग्रॅम पालकमधून साधारणत: 23 कॅलरीज्‌ आपणास मिळू शकतात. एका अभ्यासानुसार, एखाद्या महिलेने रोजच्या आपल्या आहारात केवळ पाच ग्रॅम पालकचा जरी समावेश केला तरी त्यातून 43 टक्के चांगल्या पध्दतीने वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असते. पालक एक हंगामी असल्याने ती सहजपणे उपलब्ध आहे.

पपई

प्रत्येक 100 ग्रॅम पपईमागे आपणास 43 कॅलरीज्‌ मिळतात. पपईचा औषधी गुणधर्म असल्याने तिचा वापरदेखील बऱ्याच कारणांसाठी होत असतो. यात कमी कॅलरीज्‌ असल्याने हे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरु शकते. शिवाय पपई सर्व ठिकाणी केव्हाही सहज उपलब्ध असल्याने रोजच्या आहारात तिचा वापर करता येउ शकतो. पपईत फायबरचे प्रमाणदेखील चांगले असल्याने पाचक असून भुकेला शमवण्याचे कामही चांगल्या पध्दतीने होते.

मशरुम

प्रती 100 ग्रॅममध्ये 22 केलरीज्‌ मिळत असलेले मशरुम हे ‘व्हिटामीन डी’ने परिपूर्ण आहेत. मशरुम हे केवळ वजन घटवण्यासाठीच नव्हे तर मानसिक संतुलन, क्षायराड, प्रतिकारशक्ती वाढवणे, कर्करोगापासून बचाव करणे आदी विविध आजारांवरदेखील वरदान ठरु शकतात.

बीट

बीट हे अत्यंत गुणकारी व महत्वपूर्ण घटक आहे. प्रत्येक 100 ग्रॅम बीटमागे आपणास 43 कॅलरीज्‌ मिळू शकतात. लाल रंग असलेल्या बीटमध्ये मोठ्या प्रमाणात ॲंन्टीऑक्सीडेन्ट असतात. बीटचा वापर विविध औषधी घटक म्हणूनही करता येतो.

काकडी

वजन कमी करण्यात काकडी हे अतिशय उत्तम कामगिरी बजावते. 100 ग्रॅम काकडीमधून 15 कॅलरीज्‌ मिळतात. जास्त खर्चीक नसलेली व सहज उपलब्ध असलेली काकडी सर्वच जण कमी अधिक प्रमाणात आपल्या रोजच्या जेवणात समाविष्ट करत असतो. वजन कमी करण्यासाठी काकडी एका चमत्कारापेक्षा कमी नाही. पाण्याच्या स्त्रोताने परिपूर्ण असलेली काकडी आपल्या शरीराला पाण्याच्या कमतरतेपासूनही वाचवते.

संबंधित बातम्या :

गंभीर! कोरोनाची लस न घेतलेल्या तिघांचा औरंगाबादेत मृत्यू, घाटी रुग्णालयात सुरु होते उपचार

सावधान.. लहान मुलांनाही होतोय कोरोना! अंबरनाथ, बदलापूरसह औरंगाबादमधील आकडेवारी काय सांगते? तज्ज्ञ म्हणतात

…तर कोरोना अवघ्या पाच मिनिटात होतो निष्क्रिय? जाणून घ्या काय सांगते संशोधन