
बॉलिवूडमधील आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यासह सर्वच अभिनेत्री या फिटनेसबाबत एकदम सतर्क असतात. त्यांच्यासारखी स्लिम बॉडी पाहून अनेकांना त्यांच्यासारखी बॉडी असावी अशी इच्छा निर्माण होते. स्लिम बॉडीसाठी योग्य आहार आणि व्यायामाची गरज असते. या अभिनेत्रींची माजी ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांनी फिटनेसबाबत काही माहिती शेअर केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आपण दररोज नाश्ता करतो, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणानंतरही आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आपण चिप्स, कुकीज किंवा तळलेले पदार्थ खातो. ज्यामुळे शरिराला तोटा होतो. मात्र जेवण झाल्यानंतर एखादा चविष्ट आणि पौष्टिक पर्याय उपलब्ध असेल तर शरिलाचे नुकसान होत नाही. दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांना ट्रेन करणाऱ्या फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांनी अलीकडेच एक हेल्दी नाश्ता शेअर केला. हा नाश्ता तिला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही ठेवतो. वजन कमी करण्यासाठीही हा नाष्टा आहारात सामील केला जाऊ शकतो.
आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये यास्मिनने बदामाच्या सेवनाबाबत माहिती दिली आहे. बदाम हे पोषक तत्वांचे नैसर्गिक भांडार आहे असं कराचीवाला यांनी म्हटलं आहे. कारण बदामांमध्ये प्रोटीन, फायबर आणि फॅट असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदा होतो, तसेच ज्या लोकांना काहीतरी खायची इच्छा आहे त्यांनाही चविष्ट नाष्टा मिळतो.
आपल्या व्हिडिओमध्ये यास्मिन यांनी दुपारच्या जेवणाच्या वेळी बदाम खाण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे फिटनेस सुधारते आणि आपण निरोगी राहतो असं तिने म्हटले आहे. तिने सांगितले की, जर्नल ऑफ न्यूट्रिशनल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये सकाळी बदाम खाणाऱ्या लोकांना इतर प्रकारचा नाश्ता खाणाऱ्यांपेक्षा कमी भूक लागते.
हेल्थ वेबसाइट हेल्थलाइनसह अनेक अभ्यासांनी असे म्हटले आहे की, बदाम हे सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक आहेत. यात व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते तसेच कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते.