सकाळी किंवा रात्री…त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम दिनचर्या कोणती ? जाणून घ्या
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा चमकदार आणि गुळगुळीत करण्यासाठी त्वचेची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे. तसेच स्किन केअरसाठी काही स्टेप्स आहेत जे तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवण्यास मदत करतील. तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या स्किन केअर प्रॉडक्ट वापरता. तर या लेखात आपण जाणून घेऊया की रात्री किंवा सकाळी कोणती दिनचर्या त्वचेची काळजी घेण्यासाठी फायदेशीर आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्यापैकी अनेकांची त्वचा ही काळवंडते म्हणून या दिवसांमध्ये त्वचा चमकदार करण्यासाठी आपण त्वचेची काळजी घेणारे प्रॉडक्ट वापरतो. स्किन केअर करण्याची सुद्धा दोन प्रकार आहेत, एक म्हणजे मॉर्निंग स्किन केअर आणि दुसरी म्हणजे नाईट स्किन केअर. या दोन्ही त्वचेची काळजी घेणाऱ्या दिनचर्याचे वेगवेगळे फायदे असून यामध्ये काही स्किन केअर प्रॉडक्टचा फरक आहे.
सकाळी आपण धूळ आणि उन्हात बाहेर पडतो, त्यामुळे सकाळी त्वचेची काळजी घेण्याचा फारसा फायदा होत नाही आणि त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. त्यामुळे रात्री त्वचेची काळजी घेणे अधिक फायदेशीर आहे.
मॉर्निंग स्किन केअर रूटिन:
चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने वापरतो. दिवसा चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरा. सनस्क्रीन तुमचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते. तुम्ही मुरुमांसाठी सीरम देखील लावू शकता. पण बहुतेक लोकं दिवसा घराबाहेर म्हणजे कॉलेज, ऑफिसला जातात, त्यामुळे चेहऱ्यावर धूळ आणि घाण साचल्याने आणि त्वचा स्वच्छ न दिसल्याने मुरुमांची समस्या देखील वाढू शकते.
नाईट स्किन केअर रूटिंग :
दिवसा घराबाहेर असल्याने त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेता येत नाही. अशातच रात्री तुम्ही घरी असता तेव्हा त्वचा रिलॅक्स व रिकव्हरी मोडमध्ये असते आणि ही वेळ त्वचेच्या काळजीसाठी सर्वोत्तम मानली जाते. झोपण्यापूर्वी, तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा आणि नंतर चेहऱ्यावर तेल लावा ज्यामुळे तुमचा चेहरा चमकेल आणि तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही रात्री आय क्रीम देखील लावू शकता, यामुळे तुमचे डोळे थंड होतील.
रात्री त्वचेची काळजी घेण्याचे फायदे:
त्वचा दुरुस्त करणे
रात्री आपली त्वचा रिकव्हरीच्या स्थितीत असते. रात्रीच्या वेळी, दिवसभर धूळ आणि प्रदूषणामुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यास मदत होते आणि त्वचेला बरे होण्यास वेळ मिळतो.
मुरुमांपासून आराम मिळतो
जर तुमच्या त्वचेवर मुरुमे असतील तर तुम्ही रात्री तुमच्या चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावू शकता ज्यामुळे मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो आणि तुमचा चेहरा उजळ होईल.
तुमच्या ओठांची काळजी घ्या.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लिप बाम किंवा खोबरेल तेल लावल्यास ओठ तडकण्याची समस्या कमी होऊ शकते.
चेहऱ्यावर चमक आणते
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा क्लींजरने स्वच्छ करायला विसरू नका. जर तुम्ही मेकअप लावला असेल तर तोही काढून टाका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमे थांबतील आणि तुमची त्वचाही हायड्रेटेड दिसेल.
चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही हायड्रेटेड राहणे सर्वात महत्वाचे आहे आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावत असलेली प्रॉडक्ट तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार असली पाहिजेत, तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल आणि तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
