जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय ते जाणून घ्या

उन्हाळ्यात तुम्ही बाजारात जांभळं पाहिली असतील, विकत घेतली असतील किंवा झाडावरून पाडून खाल्ली असतील. हा उन्हाळ्यातला मेवा आहे. पण जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? त्याचे फायदे काय आहेत हे माहिती आहे का? चला जाणून घेऊयात..

जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय ते जाणून घ्या
जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय ते जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 08, 2026 | 7:13 PM

उन्हाळा आला की जांभूळ हे फळ बाजारात यायला सुरूवात होते. जांभूळ पाहिलं की पाहिलं ते खाण्याची इच्छा होता. भारतीय जमिनीतील हे फळ गोड असण्यासोबत हलक आंबट असतं. त्यामुळे हे फळ लहान मोठ्यांना आवडतं. पण अनेकांना जांभूळ या फळाला इंग्रज काय म्हणतात ते माहिती नाही. भारतात असताना त्यांनी या फळाला त्यांच्या पद्धतीने नाव ठेवून मोकळे झाले होते. इंग्लिशमध्ये जांभळाला जावा प्लम, ब्लॅक प्लाम किंवा इंडियन ब्लॅकबेरी असं म्हंटलं जातं. पण हे फळ इंग्रजीत जावा प्लम नावाने प्रचलित आहे. तर काही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ब्लॅक प्लम आणि मालाबार प्लम नावही आहे. या फळाला सिजिगियम क्यूमिनी असं वैज्ञानिक नाव आहे. हा फळाचं आरोग्यदायी महत्त्व आहे. आयुर्वेदात या फळाचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. जांभूळ आरोग्यवर्धक आहे आणि त्यात अनेक पोषक तत्व आहेत. या झाडाच्या बिया, पानांमध्ये बायोएक्टिव्ह फायटोकेमिकल आढळून येतं. चला जाणून घेऊयात याचे फायदे, पोषक तत्व आणि इतर गोष्टी…

जांभूळातील पोषक घटक

जांभळाला अनेक जण इंडियन ब्लॅक बेरी असं संबोधतात. पण त्याचा ब्लॅक बेरी किंवा ब्लू बेरी फॅमिलीशी काही संबंध नाही. जांभूळ हे मिर्टेसी फॅमिलीचं फळ आहे. जांभळाचं वरचं कवच हे डार्क पर्पल म्हणजेच जांभळं असतं. पबमेडच्या रिपोर्टनुसार, जांभूळात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, बी 3, व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्निशियम, पोटॅशियम, कॉपर या सारखे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. तसेच फ्लेवोनोइड्स, पॉलीफेनोल्स आणि अँटिऑक्सिडेंट्सचंही सोर्स आहे.

जांभळाचे फायदे

जांभूळात बायोएक्टिव्ह कंपांउंड असतात. यामुळे हाय ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यात जीवाणुविरोधी तत्वही आढळतात. त्यामुळे बॅक्टेरिया वगैरे झाल्यास हे फळ उपयुक्त ठरतं. यात इंफ्लेमेटरी गुण आहेत. त्यामुळे सूज वगैरे कमी करण्यात मदत होते. जांभूळ इम्यूनिटी, हॉर्ट, डायजेशन प्रक्रियेतही फायदेशीर आहे. त्यामुळे हे औषधी आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

Follow Us