
पार्टीत वैगरे ड्रींक करणे हे आता सामान्य झालेलं आहे. त्यात अनेकदा पार्टीत ज्यांना फार ड्रिंक करण्याची सवय नाही असे लोक वाईन किंवा शॅम्पेन घेतात. कोणतेही ड्रींक प्रमाणापेक्षा जास्त घेतल्यास आरोग्यासाठी धोकादायक आहेत. पण तुम्हाला माहितीये का? बऱ्याचदा लोक गोंधळात असतात की, वाईन आणि शॅम्पेनमध्ये काय फरक आहे. वाईन तज्ञ म्हणतात की, शॅम्पेन ही एक प्रकारची वाईन आहे, परंतु प्रत्येक शॅम्पेन वाईन नसते. दोघांमध्ये मोठा फरक आहे.मग नक्की या दोघांचे काय काय फरक आहे जाणून घेऊयात.
पहिला सर्वात मोठा फरक
वाईन आणि शॅम्पेनमधील सर्वात मोठा फरक म्हणजे शॅम्पेन फ्रान्समधील शॅम्पेन शहरात बनवले असेल म्हणून त्याला शॅम्पेन म्हटलं जातं. जर तुम्ही शॅम्पेन खरेदी केलं तर त्याच्या लेबलवर असेही लिहिलेले असते की ते फ्रान्सच्या शहरात बनवले आहे. या शहराबाहेर बनवलेल्या वाईनला शॅम्पेन म्हणता येणार नाही. त्यासाठी स्पार्कलिंग वाईन हा शब्द वापरला जातो.
दोन्ही बनवण्यासाठी द्राक्षे वापरली जातात, मग फरक काय
वाईन असो किंवा शॅम्पेन, दोन्ही बनवण्यासाठी द्राक्षे वापरली जातात, पण तरीही दोघांमध्ये फरक हा असतोच. फ्रान्समधील शॅम्पेनमध्ये सामान्यतः पिकवल्या जाणाऱ्या द्राक्षांच्या प्रजातींचा उपयोग हा शॅम्पेन बनवण्यासाठी केला जातो. जसे की चार्डोने आणि पिनोट नॉयर या प्रकारच्या जातीच्या द्राक्षांचा वापर केला जातो.
वाईन बनवण्यासाठी वापरली जाणारी द्राक्षे कशी असतात?
द्राक्षांच्या अनेक प्रजाती वाईन बनवण्यासाठी वापरल्या जातात. त्या जगाच्या वेगवेगळ्या भागांमधून आणतात, पण ती द्राक्षे शॅम्पेन शहरातून आणली जात नाहीत. वाईन आणि शॅम्पेन तयार करण्याची पद्धतही अगदी देखील वेगळी. आता दोघांमधील हा फरक काय आहे हे समजून घेऊयात.
शॅम्पेन तयार करण्यासाठी काय केले जाते?
शॅम्पेन तयार करण्यासाठी, द्राक्षे एका मोठ्या टाकीमध्ये ठेवले जाते आणि किण्वन प्रक्रिया केली जाते. त्यानंतर, तीच प्रक्रिया अजून एकदा केली जाते, परंतु ती बाटलीमध्ये. यानंतर, ते 15 महिन्यांसाठी साठवले जातात आणि काही खास गोष्टी त्यात अॅड केल्या जातात. त्यानंतर, ते पुन्हा काही महिन्यांसाठी साठवले जातात आणि नंतर विक्रीसाठी पाठवले जातात. वाईन वेळा फर्मेंटेशन करून तीन वेळा स्टोर केली जाते. ते थंड केले जाते. त्यानंतर, यीस्ट आणि साखर त्यात अॅड केली जाते.
चव दोघांची वेगळी असते का?
वाईनची चव शॅम्पेनपेक्षा थोडी गोड आणि फ्रुटी असते. जे लोक ड्राय वाईन पितात ते सहसा शॅम्पेनला जास्त पसंत करतात. दुसरीकडे, ज्यांना अधिक फ्रुटी आणि गोड पेये आवडतात ते स्पार्कलिंग वाईनला जास्त पसंत करतात.
(डिस्क्लेमर: प्रत्येक परिस्थितीत एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही स्वरूपात अल्कोहोल शरीराला हानी पोहोचवते. त्यामुळे नक्कीच ते घेणे टाळलेच पाहिजे)