
भारतातील प्रत्येक राज्यात दारू विक्रीचे नियम तसेच त्यांची किंमतही वेगवेगळी असते. काही राज्यांमध्ये हे कायदे अत्यंत कडक आहेत तर काही ठिकाणी तुलनेने तेवढे कडक नियम नाहीत. महाराष्ट्रात दारू विक्रिसाठीचे नियम हे अतिशय कडक आहेत. जर एखादा कायदा कोणी मोडला तर त्याला दंडही देण्यात येतो. तसेच महाराष्ट्रात दारू खरेदी आणि विक्रिबद्दही अनेक नियम-अटी आहेत ते पाळणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. पण आता सध्या असा एक प्रश्न खूप व्हायरल होत आहे. तो म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये मिळणाऱ्या दारूमध्ये नेमका काय फरक आहे?
दारू विक्रि आणि खरेदीसाठीचे नियम
महाराष्ट्र : दारू विक्रिसाठीचे नियम हे अतिशय कडक आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात दंडही आहे.
गोवा : गोव्यात नक्कीच दारू विक्रि आणि खरेदीसाठीचे नियम फारच वेगळे आहेत. तसेच काहीजण पिकनीकसाठी किंवा काहीजण तिथे पार्टीसाठी जातात.
तेथील दारूच्या विक्री आणि दरांमध्ये मोठा फरक आढळतो. अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की, नेमकं गोव्यात दारू स्वस्त का असते आणि महाराष्ट्रात ती महाग का मिळते?
कायदे आणि परवानगी
महाराष्ट्र : महाराष्ट्रात दारू विक्रि आणि खरेदीसाठी कायदे आणि परवानगी महाराष्ट्रात दारू विक्री आणि सेवनावर Bombay Prohibition Act, 1949 लागू आहे. या कायद्यामुळे दारू विक्रीसाठी शासकीय परवाना आवश्यक असतो. दारू कुठे आणि कधी विकली जाईल यावर कडक नियम आहेत. काही जिल्ह्यांमध्ये ‘ड्राय डे’देखील पाळले जातात.
गोवा : गोवा हे भारतातील सर्वात ‘लिबरल’ राज्यांपैकी एक आहे. येथे Goa Excise Duty Act, 1964 लागू आहे आणि दारू विक्रीसाठी नियम खूप सैल आहेत. त्यामुळे बार, रेस्टॉरंट आणि वाईन शॉप्स जवळपास सर्वत्र खुले असतात.
दारूत अल्कोहोलचे प्रमाण
महाराष्ट्र :महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या दारूंच्या ब्रँडमध्ये अल्कोहोल प्रमाण नियंत्रणाखाली असतं जसे की 35–42%. त्यामुळे ती थोडी सौम्य आणि स्मूद असते.
गोवा : गोव्यात बनवली जाणारी फेणी किंवा स्थानिक रममध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते साधारण 40–45%.त्यामुळे ती प्यायल्यानंतर घशात “बर्निंग सेन्सेशन” जास्त जाणवते.
स्थानिक ब्रँड्स
महाराष्ट्र : महाराष्ट्रात स्थानिक ब्रँड्स : महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय ब्रँड्स उदा. Royal Stag, Blender’s Pride, Old Monk, Bacardi जास्त प्रमाणात विकले जातात, त्यामुळे चव अधिक क्लासिक आणि कन्सिस्टंट असते.
गोवा : गोव्यात स्थानिक ब्रँड्स उदा. Cabo, Kings, Feni हे फारच लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या चवीत थोडी देशी झलक जाणवते.
दृष्टिकोन
महाराष्ट्रात दारू पिणे अनेक ठिकाणी अजूनही सामाजिकदृष्ट्या नकारात्मकच आहे. गोव्यात, पर्यटनामुळे दारू पिणे किंवा किंवा पार्टी करणे हे पूर्णपणे सामान्य आहे.
(महत्त्वाची टीप; वरील बातमी ही फक्त माहितीपर आधारीत आणि उपलब्ध स्रोतावरूनच दिलेली आहे. त्यात कोणत्याही प्रकारे मद्यपान सारख्या वाईट सवयींना दुजोरा देण्याचा हेतू नाही. मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारकच असते आणि ते टाळलेच पाहिजे)