AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुपारच्या वेळी दारू पिल्यास होऊ शकतो दंड, या देशाने आणला अनोखा नियम

Thailand Alcohol Law: अलिकडेच थायलंडमध्ये दारूबंदीचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, दुपारी दारू पिणे, विकणे किंवा खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असा गुन्हा केल्यास दंड भरावा लागणार आहे.

दुपारच्या वेळी दारू पिल्यास होऊ शकतो दंड, या देशाने आणला अनोखा नियम
Alcohol Law
| Updated on: Nov 09, 2025 | 10:44 PM
Share

दारूचे सेवन जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात केले जाते. मात्र काही देशांमध्ये दारूबाबत कडक नियम आहेत. अलिकडेच थायलंडमध्ये दारूबंदीचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत दारू पिणे, विकणे किंवा खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असा गुन्हा केल्यास 10 हजार बाथ (अंदाजे 26 हजार) दंड भरावा लागू शकतो. हा नियम 1972 मध्ये लागू केलेल्या नियमाला बळकटी देताना दिसत आहे. संपूर्ण देशात 8 नोव्हेंबरपासून हा नियम लागू झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अल्कोहोलिक बेव्हरेज कंट्रोल अॅक्ट अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. मात्र परवाना असलेली मनोरंजन स्थळे, हॉटेल्स, विमानतळ आणि पर्यटनाचा भाग असलेल्या भागांना काही प्रमाणात सूट देण्यात आलेली आहे. तसेच या नवीन नियमांनुसार अल्कोहोलचा प्रचार किंवा जाहिरातींवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे आता सेलिब्रिटी, इन्फ्लुएंसर किंवा इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना दारूच्या प्रचारासाठी परवानगी मिळणार नाही.

काय आहे नवीन नियम?

थायलंडमध्ये लागू झाल्या नवीन नियमाबाबत बोलताना रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष चॅनॉन कोएटचारोएन यांनी सांगितले की, नवीन नियमांमुळे रेस्टॉरंट्ससाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत एक उदाहरण देताना ते म्हणाले की, जर एखाद्या ग्राहकाने दुपारी 1:59 वाजता बिअर खरेदी केली आणि ती पिण्यासाठी थोडा वेळ घेतला तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल आणि यासाठी त्याला दंड होऊ शकतो. यामुळे विक्री कमी होऊ शकते.

थायलँडमधील बँकॉकचा खाओ सॅन रोड हा बॅकपॅकर हब आहे. या ठिकाणी असलेले बार आणि रेस्टॉरंट्स सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दारू विकतात, मात्र अनेकदा ग्राहत यानंतरही दारूची मागणी करत असतात, मात्र आता अशाप्रकारे प्रतिबंधित काळात दारूची विक्री करता येणार नाही.

विरोधी पक्षाच्या खासदारांकडून विरोध

सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला आहे. पीपल्स पार्टीचे खासदार ताओफिफोप लिमजित्राकोर्न यांनी, दारू 24 तास विकली पाहिजे असे विधान केले आहे. नवीन नियमांमुळे परदेशी पर्यटकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन करू शकतात. त्यामुळे आता थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांना सावध रहावे लागणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.