हिवाळ्यात फिरायला जाताय? मग अशी घ्या त्वचेची काळजी

थंडीत बरेच जण बाहेर फिरायला जातात. पण त्याचवेळी आपली त्वचा ऊन, धूळ आणि प्रदूषण यांचा सामना करत असते. अशा वेळी त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

हिवाळ्यात फिरायला जाताय? मग अशी घ्या त्वचेची काळजी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 5:03 PM

नवी दिल्ली – हिवाळ्याच्या दिवसात बरेच जण बाहेर फिरायला (travel) जातात. अशावेळी प्रवासादरम्यान त्वचा सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषण इत्यादींच्या संपर्कात येते. यामुळे त्वचा टॅन होणे, डाग आणि मुरुमे येणे अशा त्वचेसंदर्भातील समस्या उद्भवणे हे सामान्य आहे. प्रवासात आपण फिरण्यात, नवी ठिकाणे शोधण्यात, सुंदर वस्तू खरेदी करण्यात आणि वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढण्यात इतके बिझी असतो की आपण आपल्या त्वचेची नीट काळजी (skin care) घेत नाही. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे प्रवासात असतानाही त्वचेकडे दुर्लक्ष न करता नीट काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रवासातही स्किनकेअर रूटीनचे (routine) पालन करावे.

त्वचा स्वच्छ करावी

फेस क्लिन्जरचा वापर करून तुम्ही त्वचेवर साचलेली घाण काढून टाकू शकता. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि ताजी राहते. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धुवावा. प्रवासाला जाताना तुमच्या किटमध्ये फेस क्लिन्जर ठेवा.

हे सुद्धा वाचा

मॉयश्चरायझर वापरावे

जर तुम्ही हिवाळ्यात प्रवास करत असाल तर तुमच्या किटमध्ये मॉयश्चरायझर ठेवायला विसरू नका. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये त्वचा कोरडी होतो. अशा वेळी मॉयश्चरायझरचा वापर केल्यास त्वचा कोरडेपणापासून वाचते. तसेच त्वचा हायड्रेटेड आणि मऊ राहण्यास मदत होते.

टोनर वापरा

तुम्ही त्वचेसाठी टोनर वापरू शकता. टोनरमुळे कोरडेपणा आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच टोनर हे त्वचेची पीएच पातळी राखण्यास मदत करते. टोनरमुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.

सनस्क्रीन आठवणीने वापरा

बाहेर फिरताना त्वचेचे हानिकारक यूव्ही (अतिनील) किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर आवश्यक ठरतो. प्रवासात आपण बहुतांश वेळ बाहेर घालवतो. सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडते आणि निस्तेज व निर्जीव दिसू लागते. अशा वेळी थोड्या-थोड्या वेळाने सनस्क्रीन लावायला विसरू नका. त्यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण होते.

भरपूर पाणी प्यावे

पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आपण हायड्रेटेड राहतो व उर्जाही मिळते. तसेच आपली त्वचा निरोगी ठेवण्यासही मदत करते. पाणी हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे आपली त्वचा चमकदार दिसते.

Non Stop LIVE Update
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.