आयपीएल 2024 स्पर्धेत पंचांचे वादग्रस्त निर्णय, असं एक दोनदा नाही तर पाचवेळा घडलं

आयपीएल 2024 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरु आहे. साखळी फेरीची लढत अंतिम टप्प्यात असून प्लेऑफकडे नजरा लागल्या आहे. असं असताना या स्पर्धेत पंचांचे काही निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. असं एक दोन वेळा नाही तर पाच वेळा घडलं आहे. चला जाणून घेऊयात कधी कोणता वाद झाला ते..

आयपीएल 2024 स्पर्धेत पंचांचे वादग्रस्त निर्णय, असं एक दोनदा नाही तर पाचवेळा घडलं
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 5:01 PM

आयपीएल 2024 स्पर्धा बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. या स्पर्धेत सर्वात मोठी धावसंख्या असो की षटकारांचा वर्षाव सर्वच काही आश्चर्यकारक वाटत आहे. पण एकीकडे असं सर्व होत असताना पंचांच्या निर्णयावरून वाद सुरु आहे. पंचांनी घेतलेले निर्णय काही क्रीडाप्रेमींना रुचलेले नाहीत. त्यामुळे त्यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. संजू सॅमसनची विकेटमुळे पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ बॅकफूटवर गेला आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान समोर विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं होतं. पण राजस्थानचा संघ 20 षटकात फक्त 201 धावा करू शकला. 20 धावांनी राजस्थानचा पराभव झाला. त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याचं स्वप्न लांबलं आहे. असं सर्व घडलं असताना आता मैदानातील पंच आणि थर्ड अम्पायर क्रीडाप्रेमींच्या रडारवर आले आहेत. इतकंच काय आतापर्यंत केलेल्या चुकांचा पाढा सोशल मीडियावर वाचला जात आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या पाच निर्णयावरून वाद झाला ते

संजू सॅमसन (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 56वा सामना): आयपीएलचा 56 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि संजू सॅमसन यांच्यात रंगला. या सामन्यात मुकेश कुमारने 16वं षटक टाकलं. चौथ्या चेंडूवर सॅमसनने मिड ऑनला फ्लॅट षटकार मारला. पण हा चेंडू शाई होपच्या हातात आला. पण यावेळी त्याचा पाय रोपला टच झाला की नाही यावरून वाद रंगला. यावेळी टीव्ही पंचांनी रोपला पाय टच झाला नसून बाद घोषित केलं.

विराट कोहली (केकेआर विरुद्ध आरसीबी, 36वा सामना) : या सामन्यात विराट कोहलीचा संघ 223 धावांचा पाठलाग करत होता. विराट कोहलीने 7 चेंडूत 18 धााव केल्या होत्या. तिसरंषटक हार्षित राणा टाकत होता यात स्लो फूलटॉसवर विराट कोहली डिफेंड करायला गेला आणि बॅटची किनार लागली. हा झेल थेट हार्षित राणाच्या हाती गेला. पंचांनी त्याला टीव्ही अम्पायरकडे निर्णय सोपवला. पण त्यात बाद घोषित केलं.रिप्लेत कोहली क्रिझच्या बाहेर उभा होता. तसेच हॉक आयनेही चेंडू कमरेखाली असल्याचं दाखवलं. पण पंचांच्या या निर्णयाने विराट कोहलीचं टाळकं सटकलं. पंचांशी वाद घातल्याने मॅच फीमधून 50 टक्के कापले.

मोहित शर्मा गोलंदाजीवर वाईडचा निर्णय (राजस्थान विरुद्ध गुजरात, 24 वा सामना) : आयपीएलमध्ये वाईडचा रिव्ह्यू हा एक वादाचा विषय ठरला आहे. यामुळे बराच वेळ वाया जात आहे. 10 एप्रिलला राजस्थान गुजरात सामन्यात 17व्या षटकात असंच घडलं. मोहित शर्माने शेवटचा चेंडू टाकला. हा स्लो चेंडू होता आणि सॅमसनपासून लांब होता. पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला. गिलने तात्काळ रिव्ह्यू घेतला थर्ड अंपायर अनंतपद्मनाभन यांनी वाईड नसल्याचं सांगून निर्णय बदलण्यास सांगतो. पण नंतर दुसरा रिप्ले बघतो वाईड चेंडूवर कायम राहण्यास सांगतो. हे सर्व पीएस सिस्टममध्ये ऐकायलं येत होतं. सरते शेवटी वाईड चेंडूवर कायम राहतो.

इशांत शर्माच्या गोलंदाजीवर वाईड निर्णय (लखनौ विरुद्ध दिल्ली, 26वा सामना) : या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून लखनौ फलंदाजी स्वीकारली. इशांत शर्मा पहिलं षटक टाकत होता. या षटकाचा चौथा चेंडू देवदत्त पडिक्कलच्या लेग साईटला किंचित जवळून गेला. पंचांनी वाईड देताच दिल्लीने रिव्ह्यू घेतला. हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे असता पंत मैदानातील पंचाशी बोलत होता. पंतला हा रिव्ह्यू घ्यायचा नव्हात. पण हा रिव्ह्यू पंतला गमवावा लागला. पंतने अल्ट्रा एज का पाहिली नाही असा प्रश्न उपस्थित केला.

आयुष बदोनी रन आऊट (मुंबई विरुद्ध लखनौ, 48 वा सामना) : मुंबई इंडियन्सने 144 धावा रोखण्यासाठी जबरदस्त गोलंदाजी केली. लखनौला 12 चेंडूत 13 धावांची गरज होती. हार्दिक पांड्या 19वं षटक टाकत होता. पहिलाच चेंडू कवरच्या दिशेने मारला. दोन धावा घेताना चेंडू इशान किशनकडे फेकला. तेव्हा बदोनी क्रिझच्या लाईनपासून किंचित दूर होता.पहिल्या फटक्यात चेंडू स्टंपला लागला नाही. मात्र नंतर इशानने स्टंप उडवल्या. यावेळी बदोनीने बॅट ग्राउंड केली नाही हे 50-50 टक्के होते. पण तिसऱ्या पंचांनी त्याला बाद असल्याचं घोषित केलं.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.