
बदलती जीवनशैली आणि बदलते हवामान यामुळे यासर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. एवढेच नाही तर यांचा परिणाम आपल्या केसांवर देखील होत आहे. कारण उन्हाळ्यात केस गळतीचे प्रमाण जास्त असते हे तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल. या दिवसांमध्ये तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि घामामुळे यांचा परिणाम आपल्या केसांवर होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, ज्यामुळे धुळीमुळे आपले स्कॅल्प ओले आणि खराब होऊ शकते. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळू लागतात. त्यातच सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे केस कोरडे होतात आणि खराब होतात आणि यामुळे केस गळण्याची समस्या देखील उद्भवू शकते.
उन्हाळ्यात केस गळतीबद्दल अनेक गैरसमज आहेत, ज्यावर लोकं सहसा विश्वास ठेवतात आणि त्यांना वाटते की त्यांचे केस यामुळे गळत आहेत. केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे अनहेल्दी खाण्याच्या सवयी आणि केसांवर कोणत्याही प्रकारच्या प्रोडक्टचा वापर करतात.
केसांना तेल लावल्याने केस गळती थांबते
केसांना तेल लावल्याने स्कॅल्प कोरडे पडत नसल्याकारणाने केस गळण्याची समस्या उद्भवत नाही असे जर तुमचे म्हणणे असेल तर ते पूर्णपणे चुकीचे ठरेल. जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल, तर केसांचे तेल बदलण्यापूर्वी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. फक्त केसांचे तेल बदलल्याने तुमचे केस गळणे थांबणार नाही.
केसांना तेल लावल्याने कोंडा कमी होतो
केसांना तेल लावणे हे केसांच्या कंडीशनिंगसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत करू शकते. केसांची तेले केसांच्या वाढीला चालना देऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की गळणारे केस परत वाढतील किंवा कोंडा निघून जाईल. ही देखील एक मिथक आहे.
केस घट्ट बांधून झोपल्याने केस गळती थांबते
केस घट्ट बांधून किंवा वेणी घालून झोपल्याने केस गळती थांबते या गोष्टीत अजिबात तथ्य नाही. तुम्हाला केस उघडे ठेवून झोपायचे की वेणी बांधून झोपायचे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही तुमचे केस तुम्हाला हवे तसे ठेवू शकता. तर केसांना घट्ट वेण्यांमध्ये बांधल्याने मुळे कमकुवत होतात ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि केस मुळापासून तुटण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो रात्री झोपताना घट्ट वेणी बांधून झोपू नये.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)