
सध्या सोने जगातील सर्वात महागड्या धातूंपैकी एक आहे. कारण सध्या सोन्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. सोनं हा असा धातू आहे जे सर्वांना आकर्षित करते. सोनं, चांदी, हिरे, अशा विविध प्रकारचे दागिने घालण्याची परंपरा आहे. महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडीने घालतात. तर सोन्याचं दागिने घालणे हे शुभतेशी संबंधित आहे. आपण पाहिलेच असेल अनेक स्त्रीया या शुभ कार्यात सोन्याचे हार, बांगड्या आणि अंगठ्या घालतात. तर पुरुषमंडळी देखील सोन्याचे दागिने घालतात, मात्र पायात सोन्याचे दागिने घालणे वर्ज्य मानले जाते. गर्भश्रीमंत लोकही पायात सोन्याचे दागिने घालत नाही. पायात सोनं घालू नये. असे करणे अशुभ मानले जाते. म्हणूनच आपण पाहिले असेल की महिला पायात चांदीचे दागिने घालतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात की पायात सोन्याचे दागिने का घातले जात नाही.
सोनं हे लक्ष्मी मातेचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की सोन्याचा आदर लक्ष्मी मातेप्रमाणेच केला पाहिजे. असे केल्याने घरात धनाचा प्रवाह सतत सुरू राहतो. सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते. त्यामुळे पायात सोनं धारण करणे लक्ष्मी देवीचा कोप होतो, परिणामी आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो. तसेच तुमचे जीवन आर्थिक समस्यांनी ग्रासले जाते, म्हणूनच पायात सोनं घालण्यास नकार दिला जातो. पायात सोनं धारण केल्याने देव-देवतांचाही कोप होतो.
देवगुरू बृहस्पतिच्या कृपेपासून वंचित राहावे लागते
सोन्याचा संबंध देवतांचा गुरु गुरूशी असल्याचे मानले जाते. गुरु हा धातूच्या सोन्याचा अधिपती आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की सोनं धारण केल्याने कुंडलीत गुरु ग्रह मजबूत होतो. कमरेखालील भागात म्हणजेच पायामध्ये सोनं धारण केल्याने देवतांचा गुरु ग्रहांचा कोप होतो. यामुळे कुंडलीत गुरु ग्रहाचे स्थान देखील कमकुवत होते. तसेच पायात सोनं धारण केल्याने गुरु ग्रहाचे अशुभ परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतात. याविषयी एक धार्मिक मान्यता अशी ही आहे की भगवान श्री हरी विष्णू यांना सोन्याची खूप आवड असल्याने सोने नाभी किंवा कमरेच्या खाली घालू नये. पायात सोनं घातलं तर भगवान विष्णूंचा कोप होतो. अशी चूक झाल्यास गुरु ग्रहाची पूजा करावी.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)