AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!

ही योगासने आपण दररोज करू शकता आणि सुरकुत्यांसारख्या सर्व त्रासांपासून दीर्घकाळ दूर राहू शकता.

Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी योगा
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 25, 2021 | 11:42 AM
Share

मुंबई : बहुतेक स्त्रिया आणि मुली त्यांच्या सौंदर्याबद्दल खूपच चिंतीत असतात. त्यांना नेहमीच त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसण्याची इच्छा असते. वयाच्या 35व्या वर्षी चेहऱ्यावर सुरकुत्या दिसताच महिला प्रचंड घाबरायला लागतात. या समस्येपासून बचाव करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या वस्तू वापरल्या जातात. जर आपणही आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याबद्दल खूप संवेदनशील असाल, तर काही योगासने करून आपण आपल्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवू शकाल. ही योगासने आपण दररोज करू शकता आणि सुरकुत्यांसारख्या सर्व त्रासांपासून दीर्घकाळ दूर राहू शकता (Yoga for face beauty and glowing skin).

‘पाऊट’ योगा

आजकाल मुलींमध्ये फोटो काढताना पाऊट करण्याची खूप क्रेझ आहे. आपल्याला सोशल मीडियावर मुलींच्या ‘या’ पाऊट पोझमधील बरेच फोटो देखील पाहायला मिळतील. परंतु, आपल्याला हे माहित आहे का की, पाऊट पोझ हे एक योगासन देखील आहे, जे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील कार्य करते. यासाठी, आपल्याला आपले गाल आतून खेचून घेऊन, किमान 30 सेकंद त्याच समान स्थितीत थांबावे लागेल. यानंतर, गाल मोकळे करून काही सेकंदांसाठी थांबा. दररोज किमान 4 ते 5 वेळा हे योगासन करा.

पद्मासनने मिळेल चमकदार चेहरा

पद्मासानावर बसण्याने चेहर्‍याचे तेज वाढते, तसेच सर्व शारीरिक समस्याही कमी होतात. यासाठी डाव्या पायाचा पंजा उजव्या मांडीवर आणि उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीवर ठेवा. आपले गुडघे जमिनीजवळ ठेवा. मणका सरळ ठेवा. शक्य असेपर्यंत या स्थितीत बसा (Yoga for face beauty and glowing skin).

सुरकुत्यापासून दूर ठेवेल ‘हे’ आसन

जसे तोंडात पाणी भरून आपण तोंड फुगवतो, त्याचप्रमाणे तोंडात हवा भरून फुगवा आणि काही सेकंद या मुद्रेमध्येच रहा. यानंतर, तोंड उजवीकडे व डावीकडे वळवा. यानंतर, श्वास घ्या. दररोज पाच ते सहा वेळा हा व्यायाम पुन्हा-पुन्हा करा. याने आपल्या चेहऱ्याची त्वचा ताणली जाईल, त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील. यासह, चेहऱ्यावरील चमक देखील वाढेल.

‘डबल चीन’ची समस्या कमी करेल हे आसन

जर आपल्याला ‘डबल चीन’ची समस्या असेल किंवा आपला चेहरा लोंबकळलेला दिसत असेल, तर आपली हनुवटी वर उचला आणि वर आकाशाच्या दिशेने पहा. आता आपले तोंड सतत 10 ते 15 सेकंद उघडे ठेवा आणि नंतर बंद करा. त्यानंतर, चेहरा सामान्य स्थितीत आणा. दररोज 4 ते 5 वेळा हे आसन नियमित करा.

(Yoga for face beauty and glowing skin)

 हेही वाचा :

Follow Us
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...